जि. प. प्रा. शाळा पडळीचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न.

- Advertisement -spot_img

जि. प. प्रा. शाळा पडळीचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन, ग्रामीण भागातील जि. प. शाळेचे विद्यार्थी जिवनात नेहमीच यशस्वी होतात :गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील पाडळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पुजन करून या स्नेहसंमेलनास सुरवात करण्यात आली

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहिले नाहीत हेच या चिमुकल्यांनी दाखवून दिले नृत्य अविष्कार, गायन, वादन, मनोरंजन, अशा विविध कलागुणांनाचे प्रदर्शन या विद्यार्थानी उपस्थित पालक व ग्रामस्थांना दाखवून दिले या स्नेहसंमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर माता पिता आपल्या पाल्यांचे कौतुक पाहण्यासाठी उपस्थित होते

यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले की ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आमचे शिक्षक आतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत तसेच पालकांसह ग्रामस्थांनचाही शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग आसला पाहिजे हाच हेतू समोर ठेऊन तालुकाभर या शाळांमध्ये विविध उपक्रम शिक्षण विभाग राबवत आहे.
लहान मुलांच्या अंगातील सुप्त गुणांना अशा कार्यक्रमातून प्रेरणा व प्रोत्साहन मिळते त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पाडळी शाळेतील सर्व शिक्षकांचे,ग्रामस्थांचे कौतुक केले
पाडळी शाळेसाठी शिक्षकांनी अथक परिश्रम घेत शौक्षणिक दर्जा बरोबरच सांस्कृतिक व कलेचा वारसा ही जपत हे नेत्रदीपक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे त्याबद्दल शिक्षकांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत आसे सांगितले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीमती तारामती मोटे यांनी केले. यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख राज्य नेते केशव तात्या गायकवाड, शिक्षक बँकचे संचालक संतोषकुमार राऊत, शिक्षक नेते किसन वराट, विकास मंडळ विश्वस्त मुकुंदराज सातपुते, राज्य नेते बाबासाहेब कुमटकर सर,जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथदादा चव्हाण, जिल्हा संघ माजिद शेख सर,काकासाहेब कुमटकर सर,उच्चाधिकार समिति अध्यक्ष राजीव मडके सर,जामखेड तंत्रस्नेही कार्यकारी अध्यक्ष तात्या घुमरे सर,जिल्हा नेते अर्जुन पवार,राजर्षी शाहू महाराज स्वयंसेवी संस्था फक्राबादचे अध्यक्ष श्री. अशोक राऊत, विष्णू मोहळकर, अनिलकुमार भोसले,डेटा इन्ट्री ऑपरेटर सुनिलमामा भामुद्रे,हरिदास पावणे सर, बाळासाहेब जरांडे,अतुल मुंजाळ, विजय चव्हाण, अमोल सातपुते, पोथरे येथील ग्रामविकास अधिकारी श्री हरिभाऊ दरवडे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा रत्नमाला खुटे/हजारे मॅडम,कल्पनाताई ससाणे मॅडम, म्हेत्रे मॅडम* व बहुसंख्य शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक पदी बडती झालेले आमचे मार्गदर्शक मित्र बळीराम अवसरे सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
*सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, ग्रामस्थ, पालक, पदाधिकारी यांनी आर्थिक स्वरूपात भरभरून शाळेला मदत केली, शाळेच्या विकासासाठी या निधीचा निश्चितच उपयोग होईल.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनोजकुमार कांबळे व प्रशांत कुंभार सर यांनी खूप छान केले. तर तांत्रिक साहाय्य श्री. अतुल मुंजाळ सर, गणेश रोडे सर, बाळासाहेब जरांडे सर यांनी केले. मुख्याध्यापक श्री. अवसरे सर यांनी अनमोल असे सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पदवीधर शिक्षक श्री मोहळकर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, वि. का. सोसायटी या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तारामती मोटे मॅडम, पदवीधर शिक्षक श्री पांडुरंग मोहळकर, श्री केशव हाराळे सर, जेष्ठ शिक्षिका श्रीमती वैशाली कंगे व श्रीमती छाया जाधव व सर्व विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष कष्ट घेतले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा