साहेब अजून किती लोक मारायची वाट पहाता?सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा रोड कॉन्ट्रॅक्टरला सवाल….

- Advertisement -spot_img

दोन वर्षात ४२ अपघातात ४ जणांनी गमावले प्राण..

जामखेड प्रतिनिधी

रोडचा अंदाज न आल्याने २३ वर्षीय युवकाचा अपघात होऊन गंभीर जखमी
गुरुवार दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी रात्री १:३० (दीड वाजता) कुलदीप घोळवे पोलीस यांचा पोलीस स्टेशन मधून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन आला बीड रोड वर रघुनंदन  हॉटेल समोर ढीगार्‍यावरून गाडी उडून अपघात झाला आहे एक मुलगा सिरियस आहे डोक्याला मार लागला असून कानातून रक्त येत आहे ताबडतोब या
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन रात्री दीड वाजता कडाक्याची थंडी असताना घटनास्थळी दाखल झाले रोडचे काम बऱ्याच ठिकाणी अपूर्ण असल्यामुळे ॲम्बुलन्स चालवणे सुद्धा खूप अवघड झाले आहे महत्त्वाचे म्हणजे अंकुश अरुणराव कच्छवे वय २३ हा पुण्यावरून परभणी कडे जात असताना रोडवरील ढगारा त्याच्या लक्षात न आल्याने  ढिगार्‍यावरून उडून रोडवर पडून जबर जखमी झाला बराच वेळ रोडवर पडला असल्याने तो थंडीने काकडला होता कडाक्याच्या थंडीत त्यास आणायला संजयकाका कोठारी हे ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले त्यास आपल्या रुग्णवाहिकेत आणून खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे त्याच्यावर उपचार केले असून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्याच्या घरचा अद्याप तपास लागलेला नाही
मोटरसायकल क्रमांक MH २२ BF ४२५५ असून अंकुश अरुणराव कच्छवे, मुक्काम पोस्ट तालुका दैठाणा जिला परभणी असे त्याच्या आधार कार्डवर नाव आहे
यावेळी बोलताना सामाजिक कार्य संजय कोठारी म्हणाले दोन वर्षापासून रोडचे काम चालू आहे वेळोवेळी संबंधित अधिकारी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर च्या कर्मचाऱ्यांना सांगून ते लक्ष देत नाहीत महत्त्वाचे म्हणजे याच रोडवर याच ठिकाणी बरेच अपघात झाले असून बऱ्याच लोकांचे प्राण गेले आहेत तसेच बऱ्याच जणांचे हात पाय मोडले असून डोक्याला मार लागला आहेत याकडे कोणी लक्ष देईल का मी संबंधित अधिकारी उप अभियंता अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभाग घटमळ साहेब यांना बऱ्याचदा हे सांगितले असून ठेकेदार महामार्गाचे प्रकल्प संचालक नरेंद्र गांगुली , प्रकल्प व्यवस्थापक सचिन पवार यांना पण सदर माहिती बऱ्याच वेळा सांगितलेले आहे परंतु ते लक्ष देत नाहीत तरी ताबडतोब लक्ष देऊन सौताडा घाट ते कोठारी पेट्रोल पंप पर्यंत रोडचे काम त्वरित करावे अन्यथा आम्हाला रोडवर येऊन आंदोलन करावे लागेल

सदर कामी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस देवा पळसे, कुलदीप घोळवे भोसदादा ,देशमाने, मिसाळ आकाश घागरे आणि सचिन खामकर यांनी खूप मदत केली असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा