जामखेड तालुक्यात ९१२७ पैकी ८८२१ सभासदांना ७४ कोटी ६५ लाख पीक कर्ज वितरीत झाले असून उर्वरित ३०६ सभासदांना कर्ज वितरण करण्याची प्रक्रिया चालू – संचालक अमोल राळेभात

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जामखेड तालुक्यातील सलंग्न प्राथमिक सेवा सहकारी संस्थेच्या ९१२७ नियमित कर्जदार सभासदांकडून माहे मार्च २०२४ अखेर ८५ कोटी १८ लाख ५० हजार ४९५ इतका वसुल झाला असून या सभासदांना बँकेच्या धोरणाप्रमाणे नुतनीकरण प्रस्तावास मंजुरी देवून कर्ज वितरण झाले असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल जगन्नाथ राळेभात यांनी दिली.पीक कर्ज भरणा केलेल्या सभासदांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी दि ५ एप्रिल २०२४ रोजी तालुक्यातील सहकारी संस्थेच्या सर्व संचालक मंडळ,संस्था सचिव व बँक अधिकारी यांची सयुंक्त मिटिंग घेवून बँक कर्मचारी व सचिव यांना जादा वेळ बसून काम करण्यास सांगून कर्ज वितरण लवकरात लवकर होणे संदर्भात सूचना दिल्या होत्या.त्यानुसार अमोल राळेभात यांनी दि २६ एप्रिल २०२४ रोजी तालुका विकास अधिकारी,वसुली अधिकारी,ओएस यांची संयुक्त मिटिंग घेवून पीक कर्ज वितरणाचा आढावा घेतला असता तालुक्यातील ४३ संस्थेच्या ८८२१ सभासदांच्या रूपे केसीसी खात्यावर रक्कम रु. ७४ कोटी ६५ लाख २७ हजार १५० इतकी रक्कम जमा झाली असल्याचे तसेच उर्वरित ५ संस्थेच्या ३०६ सभासदांचे कर्ज वितरण पेंडिंग असल्याची माहिती तालुका विकास अधिकारी यांनी सयुंक्त सभेमध्ये मे.संचालक साहेब यांना दिली.

घोडेगाव संस्था रु. ३१६१८७१/- ने अनिष्ट तफावतीत असून संस्थेचा तोटा रु. ५९०१०८२/- झालेला आहे.पाटोदा विका संस्था ३२१६२०३६/- ने अनिष्ट तफावतीमध्ये असून संस्थेचा तोटा रक्कम रु. ३३८८०३३६/- इतका झालेला आहे.धनेगाव संस्थेची अनिष्ट तफावत रु. २२६०८०५/- असून तोटा रु. १०९१७४४०/- इतका आहे.किसान क्रांती विका संस्था ३४०१५२/- ने तोटयात आहे.तसेच जातेगाव संस्था रु. २३०८७६८/- ने अनिष्ट तफावतीत असून संस्थेचा तोटा रु. ४०७१९५९/- झालेला आहे. या सर्व संस्थांची बाहेरून कर्ज उभारण्याची मर्यादा संपुष्टात आली होती. त्यामुळे संस्थेची बाहेरून कर्ज उभारण्याची मर्यादा मे.सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जामखेड यांच्या कार्यालयात प्रस्ताव दाखल करून त्यांची मर्यादा वाढवलेबाबतचे मंजुरी पत्र घेणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे वरील संस्थांचे प्रस्ताव शाखेत उशिरा दाखल होवूनही सर्व संस्थाचे प्रस्ताव २४ एप्रिल २०२४ अखेर मंजुर झालेले आहेत.

जिल्हा बँकेचे संचालक हे तालुक्याचे प्रतिनिधी असताना तसेच तालुक्यातील कामकाजावर संचालकाचे पूर्ण नियंत्रण असताना आणि दि २६ एप्रिल २०२४ अखेर ९१२७ पैकी ८८२१ सभासदांचे कर्ज वितरण पूर्ण झाले असताना काही पक्षाचे व संस्थेचे पदाधिकारी जाणीवपूर्वक राजकीय हेतूने, बँकेची बदनामी करणे हा एकच उद्देश डोळ्यसमोर ठेवून नगरमध्ये हेड ऑफिसला जावून राजकीय स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात हि जामखेड तालुकाच्या दृष्टीने खेदाची बाब असल्याचे परखड मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल जगन्नाथ राळेभात यांनी व्यक्त केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा