जामखेड – सकाळी जॉगिंगला जावून येते असे सांगुन गेलेली मुलगी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवून नेल्याची घटना जामखेड शहरात घडली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरूद्ध जामखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड पोलीसांनी माहिती दिली की, दि.७ रोजी पहाटे साडेपाच वाजता जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारी एक १७ वर्षे वयाची अल्पवयीन पिडीत मुलगी तपनेश्वर रोडला जॉगिंगला जावून येते असे सांगुन घरातून गेली. मात्र बराच वेळ ती घरी न आल्याने तीच्या वडीलांनी शोधाशोध केली. मात्र ती न सापडल्याने अखेर एका अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी अमिष दाखवुन फुस लावून अज्ञात कारणासाठी अज्ञात ठिकाणी पळवुन नेले असल्याची फिर्याद तीच्या वडीलांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिली त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पगारे हे करत आहेत.