शंभूराजे कुस्ती संकुलाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात 78 रक्त दात्यांनी केले रक्तदान

- Advertisement -spot_img

मंगेश आजबे यांचा गेल्या दहा वर्षांपासून रक्तदान शिबीरराचा स्तुत्य उपक्रम

जामखेड प्रतिनिधी

गेल्या दहा वर्षापासून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मंगेश (दादा) आजबे रक्तदान शिबीराचे आयोजन करतात याला ग्रामीण भागासह शहरातील तरूणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. यावर्षी  तालुक्यातील 78 रक्तदात्यांनी रक्तदान करून तरूणांनी जिजाऊंना मानवंदना अर्पण केली

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गणेश माळी, दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, यांच्या सह मंगेश (दादा) आजबे मित्रमंडळाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

शंभूराजे कुस्ती संकुल व सुरभी ब्लड बँक अ. नगर यांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते यामध्ये तरूणांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरणारे तसेच अनेक सामाजिक कामात पुढाकार घेणारे शंभूराजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने दरवर्षी जिजाऊ जयंती निमित्त जामखेड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. यावेळी 78 रक्तदात्यांनी रक्तदान करून जिजाऊंना मानवंदना दिली.

स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ ( माँसाहेब) यांच्या जयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. तसेच शिवजयंती निमित्ताने मंगेश आजबे भव्य दिव्य कुस्त्यांचा हगामा भरवत असतात. यात देशभरातील मल्ल हजेरी लावतात.

  रक्ताचा थेंब कोणाचातरी जीव वाचवू शकतो
आधुनिक काळात रक्ताची नितांत गरज असते हे ओळखून शंभूराजे कुस्ती संकुलाच्या माध्यमातून मंगेश आजबे यांनी गेल्या दहा वर्षापासून राजमाता जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेत आहेत हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.

आज दि. १२ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शंभूराजे कुस्ती संकुल च्या वतीने मंगेश कन्ट्रक्शन आँफीस शेजारी नगर रोड जामखेड भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा