जामखेड शहरात १५ वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील बराटे वस्ती येथील शिवम ज्ञानेश्वर बोराटे वय १५ वर्षे, या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजु शकले नसुन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की जामखेड शिवम ज्ञानेश्वर बोराटे, वय १५ वर्षे, हा नुकताच आठवी मधुन इयत्ता नववी मध्ये गेला होता. आज दि २५ जुन रोजी सकाळी तो आपल्या कीराणा दुकानात बसला होता. यानंतर शाळेची वेळ झाल्याने त्याची आई घरातुन दुकानात आली व त्याला शाळेत जाण्यासाठी तयारी कर असे म्हणुन घरी जाण्यास सांगितले. या नंतर तो दुसर्‍या मजल्यावरील आपली घरी गेला व सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवम याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा