जामखेड प्रतिनिधी
रत्नदीप मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. भास्कर मोरे विरोधात लैंगिक अत्याचार व अतिरिक्त शैक्षणिक फि विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारीनुसार मोरे यास अटक करुन कारवाई करण्यात आली आहे. कालच मोरे याचा जामीन जामखेड न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे दोन महिन्यांपासून मोरे जेलमध्ये आहे. पण जेलमध्ये मोरे याला फोन तसेच इतर सुविधा पुरविण्यात येतात याला जबाबदार असणाऱ्या वर गुन्हा दाखल करावा असे निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पांडुरंग भोसले यांनी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रत्नदीप कॉलेजचे प्रकरणातील आरोपी स्त्रीलंपट भास्कर मोरे हा गेली अनेक दिवस जेलमध्ये आहे, त्यास जामखेड न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय श्रीगोंदा व उच्च न्यायालयाने संभाजीनगर यांनी जामीन फेटाळल्यानंतर आरोपपत्र दाखल केले व आज दि. १० मे २०२४ रोजी पुन्हा जामखेड न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला असता याची सविस्तर माहीती आरोपीच्या परिचयातील व्यक्ती जेल च्या खिडकीमध्ये मोबाइल फोन ठेऊन फोनचा लाऊडस्पीकर चालु करून त्यास पुढील व्यक्तीसोबत संभाषण करून देत असताना आज आढळून आला ही बाब अतिशय गंभीर व बेकायदेशीर आहे.
आरोपीस याप्रकारे कैदेमध्ये फोन, घरचे जेवण व इतर सुख सोयी पुरवल्या जातात यावरून आरोपीस कायद्याचा धाक नसल्याचे निदर्शनास येते. आरोपी कैदेत असताना तासन तास फोन द्वारे संभाषण करून दिले जाते त्यावेळी जेलचा गार्ड देखील या गोष्टीला विरोध करत नसल्याचे सिद्ध होते संपूर्ण महाराष्ट्राभर गाजलेल्या संवेदनशील विषयातील आरोपीस जेल मध्ये मोबाइल फोन ऊपलब्ध होत असेल तर जामखेड पोलिस प्रशासनावर संशय निर्माण होत आहे.
सदरील आरोपीस संभाषण करून देणारा बाहेरील व्यक्ती व ड्युटीवरील जेल सुरक्षा पोलिस कर्मचारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व आरोपीस बाहेरील मिळणारी सुविधा बंद करण्यात याव्यात अन्यथा ही बाब जामखेड न्यायालय यांच्या निदर्शनास आणून देऊ सध्या जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कृत्य वाढत चालले आहे आणि जेल मधील आरोपींना फोनद्वारे संवाद करुन दिला जातो यावेळी जामखेड पोलिस निरीक्षक महेश पाटील हे फक्त बघण्याची भुमिका घेतात कारवाई मात्र करत नाही जामखेड ची कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे असे श्री शिवप्रतिष्ठान चे तालुका अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी सांगितले.
चौकट
याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले आरोपीला कधीही फोन दिलेला नाही किंवा पुढील बाजूने कोणालाही भेटू दिले जात नाही. म्हणून मागील बाजूने ओरडून जामीन फेटाळला असे कोणीतरी सांगितले. आरोपीला फोन किंवा घरचे जेवण या सुविधा दिल्या जात नाहीत.
(पोलीस निरीक्षक महेश पाटील)