महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन दिले निवेदन…

भारतीय जनताच्या पार्टी सभासद नोंदणीत जामखेड महिला आघाडी मोठे योगदान देणार: लक्ष्मीताई पवार

जामखेड प्रतिनिधी
जामखेड भाजपा महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा तथा जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार

यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची मंत्रालयात भेट घेऊन आदिवासींच्या विकासासाठी निवेदन दिले आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षण हे महत्वाचे आहे तसेच त्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या वतीने मदत करावी प्रामुख्याने महिलांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे तसेच आदिवासींच्या साठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे या संदर्भात मंत्री मोहदयांसोबत चर्चा झाली व दोन्ही नेत्यांनी आदिवासींच्या प्रश्न बाबत लक्ष्य घालुन लवकर मार्गी काढु आसे अश्वासन दिले आसल्याचे लक्ष्मीताई पवार यांनी सांगितले
तसेच भारतीय जनता पक्षाच्या सभासद नोंदणी बाबत सभापती ना. राम शिंदे यांचीही भेट घेऊन आढाव दिला महिला आघाडीला देलेले नोंदणीचे ट्रागेट पुर्ण केले आसुन मतदारसंघात पक्ष बळकट करण्यासाठी महिला आघाडी आणखी काम करणार आसल्याचे चर्चा दरम्यान सांगितले आसे म्हणाल्या.

तसेच जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने तळागाळातील सर्व समाजांच्या महिलांसाठी संस्था काम करत आहे आनेक कुटुंबांचे रेशन कार्ड, जातीचे दाखले, अरोग्य सुविधा, याच बरोबर शासकीय पातळीवर कामे संस्थेच्या माध्यमातून केलेली आहेत
यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे युवा नेते राम पवार, बाबासाहेब फुलमाळी, नवनाथ शिंदे, हर्षद काळे, सुनील जावळे हे उपस्थित होते