ज्ञानभैरव वाचनालय व ग्रामस्थ शिऊर यांच्या उपक्रमामुळे अनेकांना प्रेरणामिळाली:प्रा.मधूकर(आबा )राळेभात

- Advertisement -spot_img

शिऊर गावाचा अनोखा उपक्रम,प्रशासकीय क्षेत्रातील कर्मचारी यांचा ग्रामस्थांनी केला गौरव.

ज्ञानभैरव वाचनालय व ग्रामस्थ शिऊर यांच्या वतीने शिऊर गावातील नवीन नोकरीला लागलेले, त्याच बरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार व्यक्तीचा सन्मान,सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे  मधुकर (आबा) राळेभात यांनी शिऊर हे गाव वैचारिक दृष्टीकोनातून वेगळ्या उंचीवर असल्याचे सांगितले.ज्ञानभैरव वाचनालयामुळे कौतुक होणारे आणि ते कौतुक पाहणारे यांना योग्य दिशा मिळत आहे.दर तीन चार महिन्यालाच शिऊर गावातील नवीन नोकरीला लागणाऱ्यांचा सत्कार करण्याचा योग यायला लागला आहे. हे गावासाठी भूषण आहे.
अध्यक्षीय भाषणात बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रमुख ब्रम्हानंद शिंदे साहेब यांनी सत्कारमूर्तीचे आणि गावकऱ्यांचे कौतुक केले. अशा कार्यक्रमास शालेय विद्यार्थी उपस्थित राहिले तर आणखी चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी भावना व्यक्तकेली.नोकरदारांचे सत्कार करतात तसेच उद्दोजकांचेही सत्कार करावेत अशी चांगली सुचना मांडली. या सगळ्या संस्काराला महत्व द्यावे असे आवाहन केले.
यावेळी छाया अक्षद वीर( मार्केट कमिटी संचालक विठ्ठल चव्हाण यांची कन्या) हिला axis  बँकेत नोकरी मिळाली बी एस्सी ॲग्री असलेल्या छाया बरोबर साहेबांचा संवाद झाला आणि  बोलताना महेश पाटील म्हणाले की ज्या शेतकरी बापाला बँकेत कर्जा साठी चकरा माराव्या लागतात त्याच शेतकरी बापाची मुलगी बँकेत साहेब झाली तर कोणत्याच शेतकरी बापाला बँकेत कर्जासाठी चकरा माराव्या लागणार नाहीत.  पाटील साहेबांनी फार हृदयाला भिडणारे मार्गदर्शन केले. व्यस्त कार्यक्रमांतून शेवटपर्यंत थांबून राहिले.
फार सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सर्व सत्कारमूर्तीचा फेटा बांधून गावातून जंगी मिरवणुक काढण्यात आली.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र चे प्रमुख  ब्रम्हानंद शिंदे ,प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील ,सामाजिक बांधिलकी जपणारे मधुकर(आबा)राळेभात, तालुका अरोग्य अधिकारी डॉ. किरण कुमार जाधव ,डॉ. लक्ष्मण ठोसर या सर्व मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
विवेक राळेभात API पदी प्रमोशन,सचिन काळे भारतीय सैन्यात ज्यु.कमिशन अधिकारी, शहादेव सुर्वे सेवानिवृत्त सुभेदार,सुनिल कुमटकर मुख्याध्यापक पदी प्रमोशन, हनुमंत माने एस टी चालक नियुक्ती, सोमनाथ ज्ञानदेव तनपुरे पुणे येथे रोटरी क्लब चे अध्यक्ष पदी नियुक्ती, भरत गुलाब समुद्र पुणे ग्रामीण पोलिस, शीतल प्रकाश समुद्र अरोग्य सेविका, छाया अक्षद वीर( मार्केट कमिटी संचालक विठ्ठल चव्हाण यांची कन्या) axis Bank, अमृता उत्तम पिंपरे बीड पोलिस, गोकुळ कुमटकर शिक्षक धाराशीव,अविनाश निंबाळकर अरोग्य सेवक,माऊली निंबाळकर अरोग्य सेवक, संजना आप्पा अनभुले उत्कृष्ट अंगणवाडी,स्वप्नाली राहुल निकम अंगणवाडी मदतनीस, शिवाणी रमेश अनभुले अंगणवाडी मदतनीस, आश्विनी नवनाथ कडू अंगणवाडी मदतनीस , मोनाली अंकुश लटके अंगणवाडी मदतनीस, निकिता दादा तनपुरे अरोग्य सेविका, स्वप्नील विश्वास निकम ग्रामसेवक या सर्वांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी शीतल समुद्र,छाया वीर/चव्हाण, मेजर सचिन काळे या सत्कारमूर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले.सामाजिक कार्यकर्ते मधुकर आबा राळेभात यांनी शिऊर हे गाव वैचारिक दृष्टीकोनातून वेगळ्या उंचीवर असल्याचे सांगितले.ज्ञानभैरव वाचनालयामुळे कौतुक होणारे आणि ते कौतुक पाहणारे यांना योग्य दिशा मिळत आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रमुख ब्रम्हानंद शिंदे साहेब यांनी सत्कारमूर्तीचे आणि गावकऱ्यांचे कौतुक केले. अशा कार्यक्रमास शालेय विद्यार्थी उपस्थित राहिले तर आणखी चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी भावना व्यक्तकेली.
कार्यक्रमांचे प्रस्ताविक आबासाहेब वीर सरांनी,सुत्रसंचलन भगवान समुद्र सर यांनी तर आभार एकनाथ(दादा)चव्हाण सर यांनी केले.अध्यक्षीय सुचना परसराम उतेकर यांनी मांडली.कार्यक्रमास वैद्यकीय,सामाजिक क्षेत्रातील पाहुणे कंपनी,जामखेड मार्केट कमिटीचे शिऊर गावचे दोन्ही संचालक, शिऊर गावचे मा.पं. समिती सदस्य,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सोसाटी चेअरमन,व्हा.चेअरमन, सचिव व सदस्य,मा.ग्रा. सरपंच,उपसरपंच,सदस्य,सामाजिक कार्यकर्ते,ज्ञानभैरव वाचनालय टिम व समस्थ ग्रामस्थ शिऊर उपस्थित राहून एक दर्जेदार कार्यक्रम घडवून आणला.सर्वासाठी भोजन व्यवस्था हि बदाम निंबाळकर ग्रा.पंचायत सदस्य व हनुमंत निंबाळकर अरोग्य सेवक यांनी केली. संपूर्ण सत्कारमूर्तीचे सुंदर फेटा बांधण्याचे काम आदर्श शिक्षक बाळासाहेब जरांडे सर यांनी केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा