गंगा जमुना तहजीब बरकरार रहे – मौलाना मूफ्ती अफजल पठाण जामखेड येथे ईद उत्साहात साजरी ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन                              जामखेड प्रतिनिधी.             जामखेड शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता मौलाना मुफ्ती अफजल पठाण यांनी रमजान ईदची सामुहिक नमाज पठण केले.  यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा आरणगाव, जवळा, नान्नज, धनेगाव, पिंपरखेड आदि ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. उत्साहात सौहार्दाच्या वातावरणात रमजान ईद साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी विश्‍वशांती, बंधूप्रेमासाठी  तसेच जगात, देशात मानसा मानसामध्ये सौहार्दाचे माणुसकीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी आल्लाहकडे प्रार्थना केली. नमाज संपताच सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी ईदगाह मैदान परीसरात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा मधुकर राळेभात, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी, नगरसेवक अमित चिंतामणी, शामिरभाई सय्यद, अमित जाधव, डीगांबर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रा लक्ष्मण ढेपे, वंचित बहुजन आघाडीचे अँड अरूण जाधव, शेरखान पठाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, भाजपाचे शहराध्यक्ष पवन राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मंगेश आजबे,काँग्रेसचे राहूल उगले, जुबेरभाई शेख, मनसेचे प्रदिप टापरे, डाॅ अल्ताफ शेख, यांच्या सह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मुस्लिम बांधवांना शूभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.ईद निमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे . रोजा, नमाज, तराविह नमाज, कुराण पठण करून पुण्य मिळविण्याचा महिना म्हणून रमजान महिना मानला जातो. जगात शांतता आणि भारत देशात गंगा जमुना तहजीब (संस्कार)कायम राहावे अशी प्रार्थना मौलाना मुफ्ती अफझल पठाण यांनी केली तर देशाची एकात्मता टिकविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस कर्मचा-यांनी शहरात हा सण सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisement -spot_img

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा