सारोळा जमदारवाडी फाटा चौक बनला आहे धोकादायक,पंधरा दिवसांत झाले आनेक अपघात..
जामखेड प्रतिनिधी
जामखेड खर्डा रोडवरील सारोळा जमदारवाडी फाटा या चौकात दुपारी दीड वाजता बाबु आनिल भोरे यांचा आपघात झाला या ठिकाणी गेली पंधरा दिवसांत आनेक आपघाताच्या घटना घडल्या आहेत.
सारोळा रोडवरून खर्डा रोडला जाताना समोरील बाजूने येणाऱ्या वहानांचा आंदाज येत नाही तसेच नागेश्वर मंदिर प्रवेशद्वाराच्या बाजुने गतिरोधक नसल्याने वहान चालक सावकाश चालवत नसल्याने याठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर आपघात घडले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
तसेच आज सकाळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोनवरून खर्डा रोडवर एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली आसल्याचे सांगितले ताबडतोब आणण्याची व्यवस्था करावी संजय कोठारी हे आपली रुणवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांचा दहा-पंधरा पोलिसांचा स्टाफ तिथे हजर होता कोठारी यांनी त्या महिलेस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ती स्वतः आपले नाव तनपुरे असून मी सोनई जिल्हा अहमदनगर येथील आहे असे सांगते तिची प्रकृती बरी आहे
तसेच दुपारी दीड वाजता खर्डा रोडवरील खेमानंद हायस्कूल समोर
एक मोटरसायकलचा अपघात झाला आहे अशी माहिती संदीप सांगळे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली कोठारी हे केवळ पाच मिनिटात घटनास्थळी दाखल होऊन बाबू अनिल भोरे वय ४५ राहणार अंतरवली तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद त्या व्यक्तीस ताबडतोब आपल्या रुग्णवाहिकेत आणून खाजगी दवाखान्यात ऍडमिट केले आहे त्याला बराच मार लागला असून त्याच्यावर उपचार चालू आहे कोठारी हे पाच मिनिटात पोहोचल्यामुळे उपस्थितांनी कोठारी यांचे आभार मानले दवाखान्यात लवकर दाखल केल्यामुळे वेळीच उपचार झाल्यामुळे रुग्णाची तब्येत बरी आहे
सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड येथील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून पुढील तपास चालू आहे