GNM हा कोर्स केल्याने ग्रामीण भागातील मुली आत्मनिर्भर व स्वावलंबी बनतील :डॉ पल्लवी सुर्यवंशी

- Advertisement -spot_img

ग्रामीण भागातील मुलामुलींच्या उच्च शिक्षणाची सोय चेतना सेवा संस्थेच्या वतीने आपल्याच भागात उपलब्ध केली आहे :डॉ. सुहास सुर्यवंशी

जामखेड प्रतिनिधी
चेतना सेवा संस्था संचलित इंदिरा नर्सिंग काॅलेज साकत तालुका जामखेड येथे या वर्षी अरोग्य सेवा देण्यासाठीच्या शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या वैद्यकीय शिक्षणासाठी ग्रामीण भागात शिक्षणाची सोय नसल्याने बाहेरगावी जावे लागते व त्यासाठी कुटुंबाला आर्थिक भारही सहन करावा लागतो तसेच मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही त्यामुळे उच्च शिक्षणाविना मुलींचे लग्न लवकरच करून दिले जाते त्यामुळे त्या पुर्णताहा परावलंबी रहातात.
GNM हा कोर्स केल्याने मुलिंना शासकीय अथवा इतर ठिकाणी नोकरीची नक्की संधी आहे आणि मुली आत्मनिर्भर होऊन आर्थिक स्वावलंबी झाल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल त्यामुळे लवकरात लवकर इंदिरा नर्सिंग काॅलेज मध्ये प्रवेश घ्यावा आसे अवहान डॉ. पल्लवी सुर्यवंशी यांनी विद्यार्थी व पालकांना केले आहे.
    यावेळी बोलताना डॉ. सुहास सुर्यवंशी म्हणले की आपल्या भागातील मुला मुलींना निर्भय वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे वैद्यकीय शिक्षणाला फार महत्व आहे कोरोना काळात याची उणीव समाजाला जाणवली आहे जामखेड तालुक्यातील साकत येथे चेतना सेवा संस्थेच्या वतीने इंदिरा नर्सिंग काॅलेजची निर्मिती केली आहे  घाटमाथ्यावर निसर्गाच्या सान्निध्यात सर्व आद्यावत शौक्षणिक सुविधांनी सज्ज आसे हे काॅलेज आहे विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मुलींसाठी मोफत मर्यादित होस्टेलही उपलब्ध आहे या काॅलेज मध्ये प्रवेश घेतल्याने विद्यार्थींना प्रॅक्टीसाठी नगर येथील नामांकित हाॅस्पीटल व जामखेड शहरातील इंदिरा हॉस्पिटल उपलब्ध आसणार आहे त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय ज्ञानात आधिकची भर पडणार आसल्याचे त्यांनी Hello अहिल्यानगर न्युजशी बोलताना सांगितले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा