जमादारवाडी येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहास झाला प्रारंभ
जामखेड प्रतिनिधी
संत वामनभाऊ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत ह. भ. प. रघुनाथ महाराज चौधरी धामणगाव यांच्या कृपा आशिर्वादाने जामखेड तालुक्यातील मौजे जमादारवाडी
येथे गेली ३०वर्षे भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते सप्ताहाचे हे ३१ वे वर्ष आहे मोठ्या भक्तीमय वातावरणात हा नामयज्ञ सुरू झाला आहे प्रथम दिवशीची किर्तनसेवा जमादारवाडी येथीलच ह. भ. प. रामदास(दादा) महाराज आजबे यांची झाली प्रथमदिनी नामाचा महिमा वर्णन करावा असा सांप्रदायाच दंडक आहे या नुसार
नामचिंतनी जडली प्रिती! भगवद भावना सर्वांभुती! हेचि परमार्थ साधन मुखी नाम ह्रदयी ध्यान! विषय भोगी विलोभता! मोह न बाधीत त्या ममता! निळा म्हणे निज ध्यासे! मुक्त झाले शुका ऐसे!!
या संत निळोबाराय यांच्या अभंगावर चिंतन मांडुन मनुष्य जिवाला सुख पाहिजे तर नामस्मरण करावे आसे साधुसंतांचे दृष्टांत देत व नाम कधी घ्यावे कुठे घ्यावे कसे घ्यावे नाम कुणी घेतले त्यामुळे कुणाचा उध्दार झाला अशाप्रकारे नामाचा महिमा पटवून दिला
तसेच संत गोरोबा काकांच्या जिवन चरित्राचा दाखल देत नामाचे महत्त्व सांगितले
भगवंताच्या नामाने मनुष्य जिवाचा उध्दार होतो आणि सर्व संतांनी जिवाच्या कल्याणासाठी हा सुखर मार्ग सांगितलेला आसे आजबे महाराजांनी आपल्या किर्तनातुन चिंतन मांडले
किर्तनासाठी पंढरीनाथ महाराज राजगुरू, आंगद महाराज ढोले,दादा महाराज सातपुते, विष्णु महाराज म्हेत्रे,आश्रु महाराज कोल्हे, दिपक महाराज गायकवाड, या गायक मंडळींची तर मृदंगासाठी सुमीत सुतार यांनी साथ केली यावेळी बहुसंख्येने भाविक मंडळी उपस्थित होते.
दररोज ७ ते ९ किर्तन व त्यानंतर सर्व भाविकांसाठी मिष्टांन्न भोजनाची व्यवस्था जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम
पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ विष्णु सहस्र नाम ७ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ११ ते १२ गाथा भजन ४ ते ५ प्रवचन ५ ते ६ हरिपाठ ७ ते ९ किर्तन व नंतर हरिजागर
दिनांक १३/८/२०२४ रोजी वारकरी भुषण ह. भ. प. कैलास महाराज भोरे यांचे कीर्तन होणार आहे
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्रवणाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जमादारवाडी ग्रामस्थांनी केले आहे