सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी बेवारस मृतदेह आणला ग्रामीण रुग्णालयात
सध्या उन्हाचा कडाका भयंकर वाढलेला आहे. उष्माघाताचा त्रास अनेकांना जाणवतो. आज मोहा गावाजवळ एक मृतदेह असल्याचा फोन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना आला कोठारींनी पोलीस प्रशासनाला माहिती देत बेवारस मृतदेह ग्रामीण रुग्णालय आणला.
जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर उष्माघाताने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची बातमी समजली मंगळवार दिनांक २८/५/२०२४ रोजी दुपारी चार वाजता मोहा गावाजवळ पाईप फॅक्टरीच्या बाजूला एक माणूस उन्हात रोडवर पडलेला आहे अशी माहिती सुनील रेडे यांनी दिली माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते आपली रुग्णवाहिका घेऊन दीपक भोरे यास सोबत घेऊन घटनास्थळी भर उन्हाच्या पारात दाखल झाले.
घटनेची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना संजय कोठारी यांनी दिली यावेळी महेश पाटील स्वतः घटनास्थळी दाखल झाले सोबत पोलीस कॉन्स्टेबल दीपक बोराटे ,कुलदीप गुळवे, शिवाजी भोस ,सचिन भापकर, पोलीस नाईक सरोदे आदींनी मदत केली.
महत्त्वाचे म्हणजे साधारण ४३ डिग्री सेल्सिअस उन्हाचे तापमान असल्यामुळे या व्यक्तीस पिण्यास पाणी न मिळाल्याने उन्हाच्या तडाख्याने त्याचा मृत्यू झाला असावा असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले त्याला उचलताना त्याच्या अंगाची सालटे निघाले होते त्यास संजय कोठारी यांनी आपल्या रुग्णवाहिकेत आणून जामखेड येथील शवविच्छेदन गृहात टाकण्यात आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.