आनंदवाडी जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी उडवली धमाल. !!

- Advertisement -spot_img

जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी येथे दि.3 एप्रिल 2024 बुधवारी सायं. 7.वा.वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विस्तार अधिकारी सुरेश मोहिते यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचे कौतुक केले. शहरी भागा इतकाच दर्जेदार वार्षिक स्नेहसंमेलनाचा उपक्रम आनंदवाडी शाळेत राबवला जात असल्याबद्दल त्यांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पालकांनी या कार्यक्रमासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी मनापासून दाद दिली.

याप्रसंगी शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख केशव गायकवाड ,केंद्रप्रमुख विक्रम बडे, केंद्रप्रमुख नवनाथ बडे आदींनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध नृत्य प्रकार सादर केले.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीते स्वागत नृत्य देशभक्तीपर गीते, शेतकरी गीते, मराठी लोकगीते ,सिनेमा गीते ,तसेच आपल्या अभिनयातून उपस्थितांची मने जिंकली.
विशेषतः इयत्ता पहिलीतील पूनम भाऊसाहेब गीते हिच्या रिमिक्स गाण्यावरील गीताला श्रोत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

पुढे बोलताना सुरेश मोहिते म्हणाले की,शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत जो वार्षिक स्नेहसंम्मेलनाचा उपक्रम शाळेमध्ये राबवला जात आहे .अशा या उपक्रमासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी या शाळेने विविध गाणे, कथा व नाट्यछटा या कार्यक्रमासाठी सादर करण्याचे नियोजन केले आहे ते पाहून ग्रामीण भागातील ही शाळा शहरी भागापेक्षा उत्कृष्टपणे अध्यापन व विविध उपक्रम राबवत आहेत याचेच प्रतीक म्हणून जामखेड तालुक्यातील नवोदय परीक्षेसाठी नऊ मुलांची निवड झाली याचे श्रेय गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे व त्यांच्या टीमला आहे अशाच उपक्रमातून अनेक प्रकारचे कलाकार गायक, डान्सर ,सैनिक ,डॉक्टर इंजिनिअर हे आपल्या जिल्हा परिषद शाळेमधूनच घडत आहेत. बाबतीचा मला व शिक्षण विभागाला अभिमान व विश्वास आहे. यावेळी प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली-सदिच्छा मंडळाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक शाळा व विद्यार्थी विकासनासाठी स्नेहसंमेलनानिमित्त देण्यात येणाऱ्या २१०० /- रु बक्षीसाचे वितरण गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेने, राज्यनेते केशव गायकवाड, सुरेश मोहिते, विक्रम बडे,नवनाथ बडे,संतोष वांढरे ,शिक्षक बँकचे संचालक संतोषकुमार राऊत,विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते,जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ चव्हाण, दक्षिण जिल्हाप्रमुख केशवराज कोल्हे, जिल्हा नेते अर्जुन पवार , शिक्षक नेते किसनराव वराट, नानासाहेब मोरे,जगन्नाथ राऊत,महिला आघाडी कल्पना साबळे मॅडम,नागरगोजे मॅडम, तंत्रस्नेही संघाचे कार्यकारी अध्यक्ष तात्या घुमरे,प्रसिध्दी प्रमुख बाळासाहेब ज़रांडे, निलेश गरड,बळीराम कदम, नितिन जाधव, मल्हारी पारखे, लहू गीते,किरण दापेगावकर,विकास सौने, प्रविण शिंदे, मारूती गिते, गर्जे सर आदी शिक्षकांच्या हस्ते देण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती चौधरी मॅडम, उपशिक्षक श्रीकृष्ण बोराटे सर यांचा सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.किरण खाडे डी .वाय एस पी यांच्या वडीलांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी ५०००रु. बक्षीस जाहीर केले. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मुकुंदराज सातपुते व एकनाथ चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, सुजित खाडे, विक्रम सानप, जयसिंग राख, भारत होडशीळ, नितीन गीते,बबन जायभाय, वैजनाथ सांगळे, गणेश जायभाय, महेश सांगळे, रोहित वनवे ,दत्ता खाडे ,सागर सांगळे व इतर ग्रामस्थ, पालक , मुख्याध्यापिका श्रीम.ज्योती चौधरी मॅडम ,उपशिक्षक श्रीकृष्ण बोराटे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
उमेश दराडे साऊंड सिस्टीम दरडवाडी यांनी उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी आनंदवाडी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केशवराज कोल्हे व मारूती गिते यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका ज्योती चौधरी यांनी मानले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा