संसार उभा होण्याच्या अगोदर मोडला

- Advertisement -spot_img

ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव

जामखेड न्यूज 26 मे रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे संध्याकाळी चक्रीवादळी व जोरदार पावसामुळे खर्डा शहरालगत कानिफनाथ मंदिराच्या पायथ्याशी मंजूर असलेली यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत नव्याने वीस घरकुलांचे काम चालले होते.काम पत्रा लेवल पर्यंत आले होते.काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी मदारी बांधव पालाची झोपडी टाकून राहिला होता.परंतु निसर्गाच्या पुढे हात टेकावे लागते तसे म्हणावे ..संध्याकाळी झालेला जोराचा वारा व पाऊस यामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीचे नवीन बांधकाम चालू असलेले वीस घरकुले पडले आहेत.मोठे नुकसान झाले मदारी बांधवांच्या पालाच्या झोपड्या उडून गेल्या चिल्या पिल्ले व म्हाताऱ्या माणसांचे खूप हाल झाले खाण्यापिण्याचे भांडे वस्तू वाऱ्याने उडून गेले परंतु जीवहानी कुठलीच झाली नाही.मदारी बांधव या निसर्गाच्या संकटामुळे भयभीत झाला आहे. यावेळी भटक्यांचे नेते ॲड.डॉक्टर.अरुण (आबा) जाधव यांनी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना घेऊन तात्काळ खर्डा येथे चालू असलेले यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीची पाहणी केली तसेच मदारी बांधवांना धीर दिला.. व म्हणाले गेली 50 वर्षापासून भटक्या समाजातील मदारी बांधव खर्डा या ठिकाणी राहतो खूप गरीब व इमानदार समाज आहे. यांना जमीन घरकुल व्यवसाय नाही कला दाखवून शोभेचे वस्तू तयार करून भंगार,काच,पत्रा गोळा करून हा समाज उपजीविका भागवतो काल झालेल्या पावसामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत बांधकामाचे पडून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले सात वर्षापासून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी कार्यकर्त्यांना घेऊन संघर्ष करत आलो आहे.अखेर मदारी बांधवांचे स्वप्न होते घरे होतील व घरात जाऊन राहील हे अर्धवट झाले मी आपणास नम्र मनःपूर्वक विनंती करतो की दानशूर व्यक्ती कंपन्या सामाजिक संस्था तरुण मंडळे आपण वीट,वाळू,पत्रे,खिडकी,दरवाजे,सिमेंट याची मदत करावी, तसेच जामखेड तहसीलदार साहेब,प्रांत साहेब, कलेक्टर साहेब,पंचायत समिती, बिडिओ साहेब , आपण या कामाची भरपाई नुकसान दखल घ्यावी असे अहवान ॲड. डॉ.अरुण जाधव साहेब यांनी केले. यावेळी बबनराव बहिर (ग्रामविकास अधिकारी खर्डा) सुरज पवार (इंजिनिअर साहेब) उमाताई जाधव (ग्रामीण विकास केंद्र सचिव) विशाल पवार (आदिवासी नेते) संतोष चव्हाण सर राजू शिंदे रजनी बागवान व मदारी बांधव उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा