जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आ. रोहित पवार यांना उपराकार लक्ष्मण माने यांच्या ‘भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र’ यांनी विनाशर्थ जाहीर पाठिंबा दिला.
जामखेड येथील जाहीर सभेत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र चे सरचिटणीस नारायण जावलीकर व महाराष्ट्र उपाध्यक्ष रामकृष्ण माने यांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्या आदेशानुसार आमदार रोहित पवार यांना पाठिंबाचे पत्र दिले यावेळी भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्या ७५ व्या आहेत वाढदिवसानिमित्त एकत्र येऊन काही रक्कम जमा केली होती परंतु उपराकार माने यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की गेली पन्नास वर्षे राष्ट्रीय नेते माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या सोबत काम केले असून या पुढे ही इमाने इतबारे तन मन धनाने त्यांच्या बरोबर निवडणूक प्रचारामध्ये काम करायचे आहे तरी हा जमवलेला निधी प्रतिगामी शक्तींना पराभूत करण्यासाठी वापर करावा असे आवाहन केले व महाविकास आघाडीचे असणारे चिन्ह तुतारी वाजणारा माणूस/ हाताचा पंजा व मशाल यांनाच मतदान करण्याचे आवाहन सर्व भटक्या विमुक्तांना त्यांच्यापर्यंत पोहोचून मतदानासाठी त्यांना बाहेर काढायचे आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हा व निवडणूक यशस्वी करण्याचे आवाहन
उपराकार लक्ष्मण माने यांनी केले आहे केले.