जामखेड प्रतिनिधी
नेहमीच चर्चेत असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील जामखेड शहरात काल सायंकाळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर वॉर उफाळले होते. शहरातील खर्डा चौकातील एकाच जागी आ. रोहित पवार यांचा लावलेला कटआऊट बॅनर काढण्यावरुन व आ. राम शिंदे यांचा कटआऊट बॅनर लावण्यावरुन दोन्ही गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आमने-सामने आले होते. या बॅनर वॉर मुळे खर्डा चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तीन तास चाललेल्या या बॅनर वॉर मुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की विधानसभा निवडणुकीत आ. रोहित पवार हे विजयी झाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. रोहित पवार यांचा 25 फुट उंच बॅनर रीतसर परवानगी घेऊन लावला होता. मात्र याठिकाणी राष्ट्रवादीने लावलेल्या कटआऊटच्या परवानगीची मुदत संपली आसे भाजप कार्यकर्त्यांन कडुन सांगण्यात येत होते. यानंतर भाजपचे आ. प्रा राम शिंदे हे विधानपरिषद सभापती झाल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांन कडुन त्यांची आज रविवार दि 29 डिसेंबर रोजी दुपारी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामुळे भाजप च्या कार्यकर्त्यांन कडुन जामखेड शहरात त्यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत.

याच अनुषंगाने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांन कडुन आ. प्रा राम शिंदे यांचा सर्वात मोठा कटाऊट बॅनर लावण्यात येणार होता. मात्र हा कटाऊट आ. रोहित पवार यांचा ज्या ठिकाणी कटाऊट लावण्यात आला त्याच ठिकाणी रोहित पवार यांचा कटाऊट काढुन त्या ठिकाणी आ. राम शिंदे यांचा लावण्यात येणार होता.

त्यामुळे आ. रोहित पवार यांचा कटाऊट काढण्यास विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते खर्डा चौकात जमले होते. समर्थकांनी आ.रोहित पवार यांचा कटाऊट काढण्यास विरोध केला होता. यावेळी पोलीस प्रशासन व दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर लावण्य व काढण्यावरुन चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी मोठ्या संख्येने दोन्ही गटाचे कार्यकर्ते व नागरीक खर्डा चौकात जमा झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तसेच पोलिसांची देखील मोठी तारांबळ उडाली होती.
अखेर तीन तासानंतर प्रशासनाने आ. रोहीत पवार यांचा कटआऊट काढला यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर भाजप कार्यकर्त्यांनी आम्ही रितसर अर्ज देऊन परवानगी घेतल्यामुळे आम्ही विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा कटआऊट लावणाराच असा आग्रह धरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर नियमानुसार प्रशासनाने भाजपला परवानगी दिली. व रात्री उशिरा काढलेल्या जागेवर आ. प्रा राम शिंदे यांचा कटआऊट बॅनर लावण्यात आला.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे रमेश (दादा) आजबे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की रीतसर परवानगी घेऊन आम्ही एक महीन्यांपासून आ. रोहित पवार यांचा बॅनर लावलेला होता. या कटआऊट बॅनर ची परवानगी वाढवण्यासाठी चार वेळा रीनीवल केले आहे. आमची मुदत जरी संपली तरी पुन्हा रीनीवल करुन मुदत वाढवून घेणार होतो. मात्र जामखेड नगर परिषदचे मुख्याधिकारी यांनी भाजपच्या कटाऊटला परवानगी दिली. मुख्याधिकारी व जामखेड चे पोलीस निरीक्षक हे एकहाती पुर्ण भाजपची बाजु घेऊन काम करत आहेत आसा आरोप देखील रमेश आजबे यांनी केला . त्यामुळे उद्या पासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे तहसील कार्यालयासमोर व जामखेड पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करणार आहेत आशी माहिती रमेश आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
यावेळी भाजपचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले यांनी बोलताना सांगितले की जामखेड तालुकाला मोठे पद म्हणून नागरी सत्कार व मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. आम्ही कटआऊट लावण्यासाठी ची परवानगीसाठी 24 डिसेंबर रोजी अर्ज केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसची परवानगी 27 डिसेंबर पर्यंत होती
तरीही त्यांनी त्यांच्या नेत्याचा बॅनर लावण्याचा हट्ट धरलेला आहे. मात्र त्यांचे ऑनलाईन चलन स्विकारले नाही. तालुक्याला आ. प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून सर्वात मोठे पद मिळाले आहे. आ. राम शिंदे हे विधान परिषद सभापती झाल्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा नागरी सत्कार व सर्व पक्षीय सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळे आ. प्रा राम शिंदे यांचा कटआऊट बॅनर आम्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खर्डा चौकात लावला आहे.