राहुल गांधी यांच्यावर भाजप कार्यकर्तेंची बोचरी टीका..
मुंबई : काँग्रेस पक्षाचे पोस्टर बॉय व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या तीन पिढ्यातील पूर्वजांनी अखंड, अनिर्बंध सत्ता उपभोगताना समाज व देशाच्या हिताला बाधक अशी अनेक राष्ट्रीय पातके केली आहेत, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.
भाजप कार्यकर्ते म्हणतात की, कॉंग्रेसच्या राजवटीत सातत्याने खालावत गेलेली देशाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती, अनेक गुणवंतांची उपेक्षा केल्याने झालेला ब्रेन ड्रेन अशा विविध रूपात आजही भोगतो आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समर्थ सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीसव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकार या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची, नवनवीन कायद्यांची आखणी व अंमलबजावणी करण्याचे अथक परिश्रम गेले. दशकभार करत आहेत. त्याचे फळ म्हणून भारताला जगभर महासत्ता म्हणून तर महाराष्ट्राला भारताच्या प्रगतीचे ढळढळीत उदाहरण म्हणून मान्यता देखील आहे, असे भाजप पदाधिकारी बोलताना सांगत आहेत.
राहुल गांधी यांनी देखील वेळोवेळी वेगवेगळ्या देशव्यापी यात्रांच्या नावाखाली “बेबीज डे आऊट” देखील साजरे केले. परंतु यातील कोणत्याही प्रयत्नांना यश येताना दिसून येत नाही. उलटपक्षी एकेकाळी देशावर एकहाती अनिर्बंध सत्ता मनमानी पद्धतीने गाजवणार्यात आणि आपल्याला विरोध करणार्या वेगवेगळ्या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना खच्ची करून दिल्लीतून तुघलकी कारभार करणार्या कॉंग्रेस पक्षाला अधिकाधिक प्रमाणात प्रादेशिक पक्ष आणि कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
एकेकाळी ज्यांनी सोनिया गांधींना विरोध करत कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली व आपले स्वतंत्र प्रादेशिक पक्ष उभारले अशा महाराष्ट्रात शरद पवार, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यासारख्या व ज्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत देशभर आंदोलन करुन राजकारणात पदार्पण करणार्या अरविंद केजरीवाल संधीसाधू नेत्यांपुढे वारंवार लोटांगण घालण्याची नामुष्की कॉंग्रेसला सहन करावी लागत आहे, असा आरोप भाजप कार्यकर्ते देशभर करीत आहेत.
कॉंग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्यावर ही वेळ येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी नेहरू-गांधी परिवारातील पूर्वासुरींच्या राष्ट्रीय पातकांचे परिमार्जन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर केलाच नाही, उलटपक्षी सत्तेच्या हव्यासापोटी राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनी सातत्याने भारताच्या विरोधात भूमिका घेऊन देखील लपतछपत शी जिनपिंग यांची भेट घेणे, गलवान खोर्या्त भारत-चीन यांच्यात तनाव असताना चीनी राजदूताबरोबर पुख्खा झोडणे, देशात आणि परदेशात ठिकठिकाणी जाऊन भारत विरोधी भूमिका घेणार्यार संदिग्ध लोकांच्या भेटीगाठी घेणे आणि सातत्याने देशहिताच्या व जनहिताच्या योजनांना विरोध करणे अशी नवनवीन पापे ते करत राहिले, असे कार्यकर्ते म्हणत आहेत.