जामखेड तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व सहारा हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले रक्तदान शिबीर.
जामखेड प्रतिनिधी
राज्यात सध्यस्थितीस रक्ताची कमतरता जाणवत आहे त्यामुळे रूग्णांना या समस्येचा सामना करावा लागत आहे कोरोना नंतर आनेक नागरिकांना आजारांनी ग्रासले आहे तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे अशा रूग्णांना रक्तपुरवठा गरजेचा असतो परंतु त्याची कमतरता भासत आसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबीरांचे आयोजन आ. बच्चु कडु यांच्या आदेशाने सुरू आहे
जामखेड जनशक्ती पक्ष व सहारा हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सहारा हाॅस्पीटलच्या सर्व संचालकांनी रक्तदान करून एक आदर्श घालून दिला आहे या शिबिरामध्ये तब्बल ११८ रक्तदात्यांनी रक्तदान केले सहारा हाॅस्पीटल हे नेहमी आरोग्य विषयक शिबिर दिव्यांगांसाठी आरोग्या तपासणी मोफत उपचार शिबिरांचे आयोजन करत आसते तसेच प्रहार जनशक्ती पक्ष हा नेहमीच दिव्यांग बांधव शेतकरी बांधवांसाठी आंदोलन करून शासन दरबारी या दिन दुबळ्यांना न्याय मिळवून देत आहे जामखेड तालुक्यात जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले व तालुकाध्यक्ष नय्युमभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आनेक आंदोलने झाली व सर्व सामान्य व दिव्यांगांना न्यायही मिळवुन दिला
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, डॉ. सचिन काकडे, डॉ. सुनील हजारे, डॉ. चंद्रकांत मोरे, डॉ. दादासाहेब सावंत, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहरभाई काझी, मुख्तारभाई सय्यद, इस्माईल टेलर, प्रहार संघटनेचे जामखेड तालुकाध्यक्ष नय्यूमभाई सुभेदार, जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, शहराध्यक्ष दिनेश राळेभात, दत्ता लोखंडे यांच्यासह रक्तदाते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज कुमार शिंदे होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष सचिन उगले, शेतकरी प्रतिनिधी पंढरीनाथ दौंड, तालुका उपाध्यक्ष राहुल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी बंडू उगले, भीमराव पाटील , युवक नेते युवराज उगले, दिव्यांग सेल चे संजय मोरे, यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सहारा हाॅस्पीटलचे संचालक जयसिंग उगले यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिनेश राळेभात यांनी मानले.
चौकट
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आ. बच्चु कडु यांच्या “राज्यात रक्ताची कमी!” प्रहार उभारतय रक्तदान मोहिम” या मोहीमेला प्रतिसाद देत जयसिंग उगले व पृथ्वीराज उगले या पिता-पुत्रांनी समवेत रक्तदान करून दिला समाजाला नवा संदेश