शहरातील रस्ते झाले पाणीमय,सखोल भागातील घरांमध्ये शिरले पाणी तर जामखेड नगर महामार्गा बनला वाहतुकीसाठी धोकादायक
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील गेली दोन दिवसांपासुन जोरदार पाऊस कोसळत आहे दोन दिवस जवळपास तीन तीन तास धोधो पाऊस कोसळत आहे गेली आनेक वर्षात पावसाळ्याच्या सुरवातीला नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत सर्व तालुका पाणीमय झालेला पाहावयास मिळत आहे
यातच रखडलेल्या अर्धवट पुलाच्या कामामुळे जामखेड नगर महामार्ग ठप्प होण्याची शक्यता आहे पावसामुळे रस्ताही धोकादायक झाला आहे
जामखेड नगर रोडवरील बाफना पेट्रोल पंप शेजारी अर्धवट पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे दोन दिवसान पासुन सुरू आसलेल्या जोरदार पावसामुळे याठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी साचत आसल्याने व या महामार्गावरून पाणी वाहात आसल्याने वाहतुक देखील ठप्प होत आसुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन दिवसा नंतरही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांना व संबधित ठेकेदाराला आजुन जाग आली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की काही महीन्यांनपुर्वीच जामखेड ते चिंचपुर याराष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. जामखेड जवळील नगर रोडवरील बाफना पेट्रोल पंप शेजारी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे अर्धवट काम झाले आसुन सध्या रस्त्याचे देखील काम संथ गतीने सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून जामखेड परीसरात जोरदार पाऊस होत असल्याने या ठिकाणी पुलाजवळील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वहात आहे. तसेच पाऊस सुरू झाला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुर येऊन दोन तीन तास वाहतुक देखील ठप्प होते.
पाणी वहात आसताना वाहनचालक आपला जीव धोक्यात घालून वहाणे या पाण्यातून बाहेर काढतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दोन दिवसा नंतरही नगर जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांना व संबधित ठेकेदाराला आजुन जाग आली नसुन सध्या या मार्गावरील रस्त्याची परीस्थिती जैसे थेच आहे.
या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नळ्या व त्यावर मुरुम टाकुन रस्त्याची उंची वाढवण्यात यावी तसेच रखडलेल्या पुलाचे काम तातडीने पुर्ण करुन पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी केली आहे. मात्र सध्या तरी वाहनचालक आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून वहाणे चालवत आहेत त्यामुळे तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.