आ. रोहित पवारांनी शेतकऱ्यांसोबत बैलपोळा सण केला साजरा..

- Advertisement -spot_img

बळीराजाला सुखाचे दिवस येवो ही केली सदिच्छा व्यक्त.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात श्रावणी पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दोन दिवस आपल्या लाडक्या बैलजोडीला मोठ्या हौशेने शेतकरी त्यांची विधिवत पुजा करत आसतात पहिल्या दिवशी बैलांची खांदमळणी केली जाते पोळ्याच्या दिवशी बैलजोडीला साज चढवून ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी प्रत्येक गावात सायंकाळी पाच वाजता सवाद्य मिरवणूक काढण्यात येते त्यानंतर घरी आल्यानंतर बैलांचे औक्षण करून गोड पुरण पोळीचा नौवद्य खाऊ घातला जातो.


     याच आनुसंघाने आज कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे जामखेड दौऱ्यावर होते राजेवाडी येथील आमराई मळा येथे त्यांनी शेतकरी बांधवांसमवेत बैलपोळा साजरा केला बैलजोडीला आपल्या हातात घेऊन आमराई मळा ते राजेवाडी येथील मारुती मंदिरापर्यंत मिरवणूकीत सहभागी झाले.
        या निमित्ताने बोलताना आ. पवार म्हणाले की जगाचा पोशिंदा बळीराजा आहे आपल्या अपार कष्टाने सर्वांच्या उदरनिर्वाहासाठी आन्न धान्य पिकवतो आपल्या पोटच्या लोकांप्रमाणे जनावरांचीही काळजी घेतो त्यामुळे या बळीराजाला सुखाचे दिवस येवो त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुबत्ता वाढो शेतीमालाला चांगला भाव मिळो अशी प्रार्थना त्यांनी ग्रामदैवताला केली व
उपस्थित शेतकरी बांधवांना बैल पोळ्या निमीत्ताने शुभेच्छा दिल्या.
  यावेळी त्यांच्या समवेत राजेवाडी येथील प्रगतशील शेतकरी चेअरमन त्रिंबक कुमटकर,संदीप कुमटकर,भाऊसाहेब कुमटकर,नाना कुमटकर, आनिल कुमटकर यांच्यासह बहुसंख्येने शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा