पुढील वर्षी प्रथम क्रमांकास दोन लाख एक हजाराचे बक्षीस

साकेश्वर केसरी बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी

बैलगाडा शर्यत महाराष्ट्रातील एक पारंपरिक क्रीडा प्रकार आहे, ज्यामध्ये दोन बैलांचा एकजोड असलेल्या गाडीवर बसलेला शेतकरी त्यांना पळवून स्पर्धा करतो. ही शर्यत विशेषतः गावोगावी सण, उत्सव किंवा विशेष कार्यक्रमांदरम्यान घेतली जाते. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत शेतकऱ्यांची 450 वर्ष जुनी परंपरा आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि ही शर्यत शेतकऱ्यांच्या श्रमाचं प्रतीक मानली जाते.

साकत येथे श्री साकेश्वर महाराज यात्रेनिमित्त बुधवारी तालुक्यात प्रथमच भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. यासाठी सुमारे १७५ बैलगाड्या महाराष्ट्र भरातून दाखल झाल्या होत्या.

यावेळी पारितोषिक वितरण कार्यक्रमादरम्यान अनिलजी वराट बोलत होते. यावेळी धारा गृप आँफ कंपनी इंदोर चे चेअरमन अनिलजी वराट सह सर्व सदस्य तसेच वंदना ठाकूर इंदोर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता २०२५ तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेत्या, नित्या सिंग, विष्णू वराट, हभप उत्तम महाराज वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, पोलीस पाटील महादेव वराट, देविदास वराट, संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, उपसरपंच राजाभाऊ वराट, शहादेव वराट, नवनाथ बहिर, महादेव वराट, अविन लहाने, युवराज वराट, दत्तात्रय वराट, श्रीराम घोडेस्वार, साहेबराव वराट, तुकाराम वराट, उद्धव वराट, अजित वराट, प्रविण वराट यांच्या सह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिलजी वराट बोलताना म्हणाले की, आपले सर्वांचे ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराज व त्यांचे वाहन नंदी आहे. बैलगाडा शर्यत खुप जूनी आहे तो एक रांगडा खेळ आहे. या खेळाचे पुनर्वसन व्हावे म्हणून आम्ही ही शर्यत ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केली आहे. परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा म्हणून परिसरात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा मानस व्यक्त केला तसेच गावच्या विकासासाठी सर्वानी पक्ष भेद विसरून एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना विष्णू वराट म्हणाले की. गावाची यात्रा आहे आम्ही आमच्या पद्धतीने योगदान देत आहोत. तसेच यात्रेत साकेश्वर महाराज यांचा जलाभिषेक करण्यासाठी दरवर्षी सात नद्यांचे पाणी आणून जलाभिषेक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर म्हणाले की, अनिलजी वराट यांच्या मुळे साकत ची यात्रा महाराष्ट्र भर पोहचवली आहे. दरवर्षी हगामा व बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट म्हणाले की, धारा गृप आँफ कंपनी इंदोर मुळे यात्रेचे स्वरूप बदलले आहे देशभरातील मल्ल साकतच्या हगाम्यासाठी हजेरी लावतात तसेच रांगड्या बैलगाडा शर्यतीसाठी महाराष्ट्र भरातून बैलगाड्या आलेल्या आहेत. अनिलजी वराट यांचे सामाजिक धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे मनही खुप मोठे आहे.