जामखेड पीपल्स एज्युकेशच्या शिक्षक भरतीला उच्च न्यायालयात आव्हान.

- Advertisement -spot_img

शिक्षक भरती विरोधात बाळासाहेब पवार यांनी केली याचिका दाखल.

जामखेड प्रतिनिधी

जामखेडच्या वादग्रस्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पोर्टल मार्फत होत असलेल्या शिक्षक भरतीला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या संस्थेचे विश्वस्त मंडळ बोगस असून 2001 पासून या संस्थेची विश्वस्त मंडळाची निवडणूक झाली नाही. तेव्हापासून सर्व बदल अर्ज धर्मदाय उपआयुक्त अहमदनगर यांनी रद्द केलेले आहेत.

त्याबद्दल एक दावा धर्मदाय आयुक्त पुणे व दोन दावे धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांच्या समोर प्रलंबित आहेत. तरी ही पोर्टल मार्फत काही बोगस लोक संस्थेचे पदाधिकारी म्हणून कारभार पाहत आहेत. या नोकर भरतीत उमेदवारांची आर्थिक फसवणूक होऊ नये व त्यांची इतर ठिकाणची संधी जाऊ नये म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयात या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला दिलीप बाफना व बाळासाहेब पवार यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. व ही नोकरभरती रद्द करावी अशी मागणी केली आहे.

या संस्थेचे विश्वस्त मंडळ बोगस असून नोकर भरतीचां त्यांना अधिकार नाही असे निवेदन शिक्षण संचालक पुणे व माध्यमिक शिक्षण अधिकारी अहमदनगर यांना ही भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हाच दिले होते. परंतु पवित्र पोर्टल प्रणालीत या संस्थेचे नाव नव्हते परंतु अचानक या संस्थे ने उमेदवारांना मुलाखती साठी  मेल केले आहेत. यांना मुलाखती किंवा नियुक्ती करण्याचा अधिकारच नाही. अशाच पद्धतीने जामखेड महाविद्यालयात प्राचार्य पद भरण्यात आले त्यांची याचिका लवकरच दाखल केली जाईल. नोकरीसाठी येणाऱ्याला ही माहिती नसल्या मुळे त्याची फसवणूक होते त्यामुळे नोकरभरती करू नये म्हणून ही याचिका दाखल केली असल्याचे याचिकेत म्हंटले आहे. 

या विश्वस्तांनी केलेल्या नियुक्त्या कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकतात. संस्थेचे अध्यक्ष हे कायदेशीर अध्यक्ष नाहीत. संस्थेचे सचिव तर संस्थेचे सदस्य पण नाहीत. त्यांना शिक्षक नियुक्ती आदेश किंवा पुढील शिक्षक मान्यता प्रस्ताव करण्याचा अधिकार नाही तसे केल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
या संस्थेचे अनेक गैरव्यवहार ची चौकशी करण्याची मागणी ही याचिकेत करण्यात आली आहे . नुकतेच एका कुटुंबाने नोकरभरतीत या संस्थेने चुकीच्या पद्धतीने भरती केलेल्या उमेदवाराची नियुक्ती रद्द करावी म्हणून जिल्हा परिषद अहमदनगर येथे उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा