जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील मोरेवस्ती कडे जाणार्या जुना शिऊर रोडवरील पुलाचा कठडा मागिल एक वर्षापासून कोसळला आसल्याने यावर्षी पावसाच्या पाण्याने हा पुल आनखी धोकादायक झाला आहे. या पुलाचा कठडा कोसळल्याने मोठा आपघात होण्याची शक्यता आसुन तातडीने या ठिकाणी नविन पुल बांधण्यात यावा अशी मागणी परीसरातील रहिवाशी करत आहेत.
जामखेड शहरातील मोरी वस्तीकडे जाणार्या पुलाची अतिशय दुरावस्था झाली आहे. हा पुलाचा मागिल पावसाळ्यात कठडा कोसळला आहे.
मात्र गेल्या एक वर्षांपासून याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. सध्या या पुलाची एक बाजु पुर्णपणे कोसळली आसल्याने येणार्या जाणार्या नागरीकांसाठी सध्या हा पुल धोकादायक बनला आहे. परीणामी या ठिकाणी रात्रीचा मोठ्या प्रमाणात अंधार असतो त्यामुळे एखादे बहान पुलावरून जाताना मोठा आपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने याठिकाणी नविन पुल बांधण्यात यावा अशी मागणी परीसरातील रहिवाशांनी केली आहे.
पोलीस स्टेशन पासून मोरे वस्ती रोडवर नदीवर असलेल्या पुल पावसाने पुलाची एक बाजु वाहून गेला असल्याने या ठिकाणी असलेले रहिवाशी संदीप गायकवाड यांनी सांगितले की यापुलाची अतिशय धोकादायक अवस्था झालेली आहे. साईटला कठडा नसल्यामुळे पावसाळ्यात एखादा व्यक्ती नदीत पडु शकतो व अपघात होऊ शकतो. अशी सध्याची परिस्थिती आहे. ही सगळी परिस्थिती जिल्हा परिषदचे बागुल साहेब यांना घटनास्थळी आणुन दाखवली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते संदीप गायकवाड सह संबंधित जिल्हा परिषदेचे अधिकारी बागुल साहेब उपस्थित होते. यानंतर बागुल साहेबांनी सांगितले की या पुलाची तात्काळ दखल घेऊन पुलाचे इस्टिमेंट बनवलेले आहे. या नंतर आमदार रोहित (दादा) पवार याच्याकडे तात्काळ या संबंधीत मागणी करून लवकरात लवकर नवीन पुल बांधण्यासाठी त्यांच्या कडुन नीधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे युवा नेते संदीप गायकवाड यांनी सांगितले.