खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार – उपविभागीय वनाधिकारी मोहन शेळके
जामखेड प्रतिनिधी.,
गेल्या दोन दिवसांपासून जामखेड शहरात विविध भागात बिबट्या असल्याच्या खोट्या अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फोटो इडिट करून टाकले जात आहेत. आता जर कोणी अशी खोटी अफवा पसरवली तर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा कर्जत जामखेडचे उपविभागीय वनाधिकारी मोहन शेळके यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी साकत घाटात तसेच, मोहा व भुतवडा परिसरात बिबट्या काही जणांनी पाहिला होता व्हिडिओ पण काढले होते ती बातमी खरी होती पण दोन दिवसांपासून सदाफुले वस्ती, म्हेत्रे वस्ती, नुरानी काँलनी येथे बिबट्या आला ही बातमी खोटी आहे अशी अफवा कोणीही पसरवू नये अन्यथा अशा व्यक्ती विरोधात वन विभाग गुन्हा दाखल करेल असे सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षी जामखेड तालुक्यातील जातेगाव, नायगाव, धामणगाव, मोहरी, दिघोळ परिसरात बिबट्या असल्याच्या बातम्या येत होत्या वनविभागाने अनेक वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. तसेच धामणगाव येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता. तर आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या सापडला होता.
वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी बिबट्याच्या मागावर आहेत. जामखेड तालुक्यात साकत, भूतवडा,सावरगाव, लेहनेवाडी, धोत्री, आदी भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याला अनेक ठिकाणी लोकांनी पाहिले आहे. वनविभागाच्या जिल्हा पातळीवरील आधिकार्यांनी लक्ष घालून बिबट्या पकडण्याचे पिंजरे व प्रशिक्षित कर्मचारी स्टाफ जामखेडला पाठविण्याची गरज आहे. तातडीने वनविभागाने याची दखल घ्यावी. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी व येण्या जाण्यासही भीती वाटत आहे. जामखेड परिसरातील नागरिक फार मोठ्या भीतीच्या वातावरणात वावरत आहेत.
डोंगर भागात तसेच ऊस पट्यात बिबट्या आहे पण शहरात कोठेही बिबट्या नाही यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे वनाधिकारी यांनी सांगितले आहे.
चौकट
नागरिकांनी अंधारात एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईल वर गाणे लावावीत, शेळ्या, मेंढ्या, वासरे कुंपणाच्या आत ठेवावेत हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी.
मोहन शेळके
(कर्जत-जामखेड उपविभागीय वनाधिकारी