कर्जत जामखेड मतदार संघात चुरशीची लढत..

- Advertisement -spot_img

रोहित पवार विरुद्ध प्रा. राम शिंदे यांचाच सामना,भाजपाकडून प्रा राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर

जामखेड प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातून प्रा राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मोनिका राजळे, राहुरी शिवाजीराव कर्डीले, शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील, श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्या आहेत.

या यादीनुसार, आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम, अतुल भातखळकर यांना कांदिवली पूर्व, राम कदम यांना घाटकोपर पश्चिम, मीहिर कोटेचा यांना मुलूंड, गणेश नाईक यांना ऐरोली, रविंद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावेळी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रोहित पवार यांची उमेदवारी फिक्स असून समोर महायुतीची उमेदवारी प्रा. राम शिंदे यांना जाहीर झाली आहे.

कर्जत जामखेड मतदार संघात प्रा. मधुकर राळेभात व आमदार राम शिंदे यांनी जनसंवाद यात्रा काढुन आमदार रोहित पवार यांची पोल खोल केली तर आमदार रोहित पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही स्वाभिमान जनसंवाद यात्रेतून आमदार राम शिंदे व मधुकर राळेभात यांना जसाश तसे उत्तरे देऊन केलेले विकासकामे सांगून पोल खोल केली.  ह्या सर्व घडामोडी व आरोप – प्रत्यारोपाच्या तोफांचे चित्र कर्जत – जामखेडच्या जनतेने पाहिले.

  आमदार राम शिंदे हे विधान परिषदेतून २०२२ साली सदस्य झाले. त्यांचा कार्यकाल २०२८ पर्यंत आहे. मागील दोन वर्षापासून ते मतदारसंघात सक्रीय झालेले आहे. राज्यातील सत्ताबदलाचा फायदा घेत त्यांनी एमआयडीसी कर्जत तालुक्यात आणली. पाच वर्षे रखडलेल्या जामखेड पाणीपुरवठा योजनेला गती दिली. कृष्णा भिमा स्थिरीकरणासाठी चालवलेला प्रयत्न पाहता भाजपाचा उमेदवार मीच असुन आमदार रोहित पवार यांना मीच फाईट देऊ शकतो असे चित्र निर्माण केले आहे.

कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात 25 वर्षापासून भाजप सत्तेत होती. 2019 ला राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना 43 हजार मताधिक्याने निवडुन दिले व  25 वर्षानंतर भाजपचा बालेकिल्ला उध्दवस्त केला. आमदार रोहित पवार निवडून आल्यानंतर त्यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेची स्थापना करून विकासाचा रोडमॅप तयार केला. राज्यातील सत्तेचा फायदा घेत पहिल्या सहा महिन्यात कामाचा धडाका लावला. कर्जत जामखेड शासकीय अधिकारी व कर्मचारी स्थानिक पातळीवर राहीले तर जनतेचे कामी मार्गी लाघू शकतात या हिशोबाने सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या व प्रशासकीय इमारती अद्यावत केल्या तसेच मिरजगाव व खर्डा पोलीस स्टेशनची निर्मिती केली, तरुणांना रोजगार मिळावा म्हणून जामखेड नगरपरिषदेसमोर तीन मजली अद्यावत शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्प्यात आहे. जामखेड येथे पाच मजली उपजिल्हारूगणालय, जामखेड कर्जत भव्य बसस्थानक, जामखेड शहरातून जाणाऱ्या विंचारण व नागेश्वर नदीचे सुशोभीकरण करून नागरिकांना सिमेंटचा रस्ता जॉगिंग साठी केला. नागेश्वर नदीच्या तिरावर जामखेड नगरपरिषद कार्यालय, नानानाणी पार्क, अद्ययावत वाचनालय, विद्यार्थ्यांना अभ्यासिकासाठी अद्यावत वाचनालय तयार केले तसेच सतत पाच वर्षे नागरिकासाठी फिरता दवाखाना, डोळे तपासणी व शस्त्रक्रिया तसेच बचतगटाच्या माध्यमातून 7 हजार जणांना कर्जसुविधा, दहा हजार शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप, राज्य राखीव दलाचे जळगाव येथे गेलेले प्रशिक्षण केंद्र परत आणून चालू केले. खर्डा येथील भुईकोट किल्ल्यासमोर भारतातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज उभारून ग्रिनिज बुकमध्ये नोद झाली अशा विविध कामामुळे व सातत्याने जनतेशी संपर्क व प्रत्येक कुटुंबाशी जोडले गेले आहे यामुळे आ. रोहीत पवार यांचे काम बोलते असे नागरीकात चित्र निर्माण झाले आहे. केलेले विकासकामे व थेट जनतेशी असलेला संपर्क पहाता विदमान आ . रोहीत पवार पुन्हा उमेदवार असल्याने आघाडीत बिघाडी नाही.

    लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना 9 हजार 128 चे मताधिक्य मिळाले आहे . 2019 मध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंना 24 हजारांचे मताधिक्य होते यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ रोहीत पवार यांना 43 हजाराचे मताधिक्य मिळाले . हेच मताधिक्य लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस टिकवून ठेवू शकले नाही.

   लोकसभा निवडणुकीत मताधिक्य पाहता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 1995 ते 2014 पर्यंत असलेला भाजपचा बालेकिल्ला परत राखण्यासाठी महायुती जोरदार आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कामाला लागली आहे तर दुसरीकडे आमदार रोहित पवार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असुन महायुतीत आमदार राम शिंदे यामुळे चुरशीची लढत होणार असुन कर्जत जामखेडची जनता कोणाला स्वीकारणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा