आमदार प्रा राम शिंदे यांनी साधेपणाने भरला उमेदवारी अर्ज

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी,
आमदार प्रा.राम शिंदे यांनी सामान्य नागरिकांच्या सोबतीनं आणि महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ना गाजावाजा, ना शक्तिप्रदर्शन,अतिशय साध्या पध्दतीने आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयात २५ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी आमदार राम शिंदे यांनी आज सकाळी श्री क्षेत्र चोंडी येथील अहिलेश्वर मंदिरात सहकुटुंब अभिषेक केला त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे, पत्नी आशाताई शिंदे, बहिण शोभा देवडे ह्या उपस्थित होत्या. अभिषेक संपन्न झाल्यानंतर चोंडी येथील निवासस्थानी आई भामाबाई शिंदे, पत्नी आशाताई शिंदे, भगिनी शोभा देवडे व अन्य महिलांनी आमदार शिंदे यांचे औक्षण केले. यावेळी आमदार शिंदे यांनी आई भामाबाई शिंदे यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर्जतला रवाना झाले.

कर्जत शहरात दाखल झाल्यानंतर आमदार राम शिंदे यांनी कर्जत शहराचे ग्रामदैवत संत गोदड महाराज समाधीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. व त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह कर्जत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते दाखल झाले. त्यांनी दुपारी साडेबारा वाजता भाऊसाहेब कोंडिबा साळवे,भानुदास साहेबराव धांडे, सलिम इस्माईल तांबोळी, रविंद्र कुलकर्णी, योगिराज घायतडक, अर्जुन निमोणकर या मतदारसंघातील स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आमदार प्रा राम शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर सुचक म्हणून संपत जायभाय, अनिल शोभाचंद भंडारी, जनाबाई दिगांबर गदादे,लहू रंगनाथ लोंढे,विनायक जोशी यांचा समावेश आहे.

कोणताही गाजावाजा न करता, शक्तीप्रदर्शन न करता आमदार प्रा राम शिंदे यांनी शुक्रवारी (२५ रोजी) आपला उमेदवारी अर्ज अतिशय साधेपणाने दाखल केला. मागच्या तिन्ही निवडणूकीत आमदार राम शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात,पै प्रविण दादा घुले, जि.प. सदस्य अशोक खेडकर, प्रा सचिन गायवळ, राजेंद्र गुंड, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे,शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने, तालुकाध्यक्ष अजय काशिद, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, शिवसेना तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ॲड बाळासाहेब शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, शोएब काझी, माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, माजी उपसभापती रविंद्र सुरवसे, संजय भैलुमे. सभापती काकासाहेब तापकीर, सभापती शरद कार्ले, सचिन पोटरे, काकासाहेब धांडे, माजी सभापती प्रकाश शिंदे, शांतीलाल कोपनर, शहाजीराजे भोसले, दादा सोनमाळी, संपत बावडकर, बापुसाहेब शेळके, अभय पाटील, सुनिल काका यादव, बापुराव ढवळे, धनंजय मोरे, अनिल गदादे, गणेश क्षीरसागर, पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचरणे, पवनराजे राळेभात,अमित चिंतामणी,नंदकुमार गोरे, सचिन घुमरे, डाॅ गणेश जगताप, तुषार पवार, सोमनाथ राळेभात, पोपट राळेभात,  संपत राळेभात,संतोष गव्हाळे, जमीर बारूद, शाकीर खान, लहू शिंदे, वैजिनाथ पाटील, बाजीराव गोपाळघरे, संजय गोपाळघरे, प्रशांत शिंदे, सुशिल आव्हाड, अपंग आघाडीचे सुहास गावडे (कारभारी), महिला तालुकाध्यक्ष संजीवनीताई पाटील, ॲड प्रतिभाताई रेणूकर, शिवसेना नेत्या डाॅ शबनम इनामदार, अर्चना राळेभात, अर्चना सोमनाथ राळेभात, सह महायुती व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा