जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात बारा वर्षांची परंपरा जपत यावर्षीही प्रजासत्ताक दिना दिवशी संविधान अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला भारतीय संविधान अंमलात येऊन 75 वर्ष पुर्ण झाल्याने 26 जानेवारी रोजी सायंकाळी बाजारतळ येथे सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांच्या आयोजनाखाली कार्यक्रम संपन्न झाला..संविधान सन्मान पायी रॅलीत संसद भवनाचा देखावा तयार करण्यात आला होता खर्डा चौक येथे संविधान प्रतिकृतीचे पुजन करण्यात आले तद्नंतर बाजारतळ येथे महाराष्ट्राचा सुपरस्टार गायक संतोष जोंधळे यांचा हजारोंच्या संख्येत गायनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी जेष्ठ नेते प्रा.मधुकर आबा राळेभात,तहसिलदार गणेश माळी,मुख्यधिकारी अजय साळवे,यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना संविधान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले..
यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात डाॅ.प्रदीप कात्रजकर,पत्रकारिता क्षेत्रात दिपक देवमाने,शैक्षणिक क्षेत्रात बाळासाहेब पारखे,सामाजिक क्षेत्रात कॅप्टन लक्ष्मण भोरे,साहित्यिक क्षेत्रात गोकुळ गायकवाड,मागासवर्गीय वसतिगृहातील लिपीक मधुकर महानूर यांना सन्मानित केले..
याप्रसंगी समाजातील जेष्ठ नेते प्रकाश सदाफुले,माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक,राजन समिंदर सर,भिमटोला ग्रुपचे बापुसाहेब गायकवाड,प्रा.सुनिल जावळे,प्रभाकर सदाफुले,माजी मंडलाधिकारी मुरलीधर सदाफुले,माजी सभापती सुभाष आव्हाड,माजी बँक अधिकारी एम.पी.साळवे, रंजन मेघडंबर,मुकुंद घायतडक,सचिन सदाफुले,किशोर सदाफुले,शेखर घायतडक,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव सुरेखा सदाफुले,अधिक्षक शोभा काबंळे,अरुणा सदाफुले,मालन घायतडक,रोहीणी सदाफुले आदी हजारोंच्या संख्येत समाज बांधव उपस्थित होते….
कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,दादासाहेब घायतडक,रवी सोनवणे,किशोर काबंळे,प्रमोद सदाफुले,सचिन सदाफुले,लखन मोरे,सनी प्रिन्स सदाफुले,अक्षय घायतडक,विकीभाई गायकवाड,प्रतिक सदाफुले आदी भिमसैनिकांनी परिश्रम घेतले