छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंकजशेठ चौधरी यांच्या वतीने शिवगर्जना भक्ती महोत्सवाचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील चौधरी नगर येथे भक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात सुरू झाला आहे

गेली आनेक वर्षापासून या नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आसते
तसेच पंकजशेठ चौधरी यांनी परिसरातील भक्तगणांसाठी भव्य प्रभागांत गणेशाचे भव्य असे मंदिर बांधलेले आहे आणि या ठिकाणी
गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री पंकजशेठ चौधरी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे या भक्ती महोत्सवात महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांच्या किर्तन सेवा संपन्न होणार आहेत

प्रथम दिवशीची किर्तनसेवा ह. भ. प. राम महाराज खोले यांची झाली

यावेळी त्यांनी सांगितले की देवाने आपल्याला नरदेह दिला आहे त्यामुळे त्याची भक्ती आपण करावी हे ज्यांना कळाले त्यांचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही पण
जे क्रोधी अविश्वासी लोक आसतात त्यांना उपदेश करून काही उपयोग होत नाही त्यांची संगत चांगल्या मानसांना अपाय करू शकते तसेच

संत जगाच्या उद्धारासाठी जन्म घेत आसतात आनेक संतानी अज्ञानी समाजाला भक्ती मार्गावर आणण्यासाठी आपले अयुष्य खर्च केले परंतु तरीही समाजातील काही घटकांना संताचे विचार पचणी पडल्याने सर्व संतांना तत्कालीन समाजाने त्रास दिला तरी आईच्या मायाने संतांनी त्यांनाही माफ करून त्यांचा देखील उध्दार केला आसल्याचे महाराजांनी निरुपन करताना सांगितले
चिंतनासाठी महाराजांनी
सदा नाम घोष करू हरि कथा
तेणे सदा चित्ता समाधान
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार
या जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा अभंग चिंतनासाठी घेतला होता.
त्यांना गायनाचार्य आंगद महाराज ढोले, मुकुंद महाराज भवर, भागवताचार्य गोरक्षनाथ भिल्लारे, माऊली महाराज, बाबामहाराज वटाणे यांची साथ लाभली