कर्जत जामखेडमध्ये भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

- Advertisement -spot_img

रोहितदादा पवार मित्र मंडळाकडून जोरदार तयारी सुरु

अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी आणि ऋता दुर्गुळे प्रमुख आकर्षण

कर्जत-जामखेड ३०-कर्जत जामखेड मध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जतमध्ये १ सप्टेंबरला दादा पाटील महाविद्यालय इथं सा. ६ वाजता तर जामखेडमध्ये २ सप्टेंबरला नागेश विद्यालय इथं सां. ६ वाजता या दहीहंडी स्पर्धा होणार आहे.
   

   आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने कर्जत जामखेडमध्ये दरवर्षी भव्य दहीहंडी स्पर्धा आय़ोजित करण्यात येते. यावर्षीही दहीहींडी स्पर्धेचे आय़ोजन करण्यात आले आहे. ही दहीहंडी स्पर्धा कर्जत आणि जामखेडमध्ये होणार आहे. कर्जत मध्ये होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेला मराठी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांची खास उपस्थिती राहणार आहे तर जामखेडमध्ये होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि ऋता दुर्गुळे ह्या उपस्थित राहणार आहेत. कर्जत-जामखेडमध्ये होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठी १ लाख ११ हजार १११ रुपये प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या दहीहंडी स्पर्धेची सध्या जोरदार तयारी सुरु असून कृष्णाच्या बाललीलांची आठवण करुन देणारा हा सोहळा आपल्या सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. या दहीहंडी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा