लग्नानंतर विसाव्या दिवशीच काळाचा घाला
जामखेड तालुक्यातील साकत (हनुमान वस्ती) येथील सुरज महादेव मिसाळ वय २२ याचे अल्पशा आजाराने हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. मिसाळ कुटुंबिय तसेच नातेवाईक व मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सुरज महादेव मिसाळ हा तरुण बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मामाबरोबर साईनाथ मेडिकल चालवत होता. काल मेडिकल मधुन घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
सुरजचे बावीस दिवसांपूर्वी 2 मे रोजी लग्न झाले होते. सुरजला बरे वाटत नाही म्हणून बीड येथील दवाखान्यात काही दिवस उपचार घेतले होते. बीड वरून आल्यावर बरे वाटल्याने काल तो मेडिकल मध्ये गेला होता. सायंकाळी घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने जामखेड येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत तो मयत झाला होता. आज सकाळी सात वाजता हनुमान वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरजच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
सुरजच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, एक भाऊ व बहिण असा परिवार आहे.