अहमं वाघा सोहमं वाघा! प्रेम नगरा वारी! सावध होऊनी भजनी लागा! देव करा कैवारी! वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी!!  संतांनी सांगितलेल्या मार्गाने भाविक निघाले जेजुरीच्या वारीला.

- Advertisement -spot_img

जामखेड ते जेजुरी बुधवारी पायी दिंडीचे येळकोट येळकोट जय मल्हारच्या च्या जयघोषात प्रस्थान


जामखेड – शिवमल्हार ग्रुपच्या वतीने जामखेड ते जेजुरी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजित करण्यात येते दिंडीचे हे 21 वे वर्ष आहे. बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान जामखेड शहरातील खंडोबा मंदिरात भावीक भक्तांनी दर्शन घेतले व सजवलेल्या बैलगाडीच्या  रथात खंडोबाची मुर्ती ठेवण्यात आली. यानंतर नगारा वाद्यवृंदात येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष करून हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत दिंडीचे प्रस्थान करण्यात आले.
जामखेड ते जेजुरी पायी दिंडी सोहळ्याची योजना सुभाष मेनकुदळे,अर्जुन निमोणकर व गणेश काळे यांच्या संयोजनाने महेश महाराज देशपांडे व वैभव देशमुख यांच्या प्रेरणेने होत आहे. बुधवारी खंडोबा मंदिरातून दिंडीचे प्रस्थान झाले दिंडी जामखेड शहरातील संविधान चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पेठेतुन नगर रोडवर आली ठिकाणी पुष्पवृष्टी फटक्यांची अताषबाजी करून ग्रामस्थांनी स्वागत केले संबळ हलगी टाळ मृदुंगाच्या निनादात शहरातुन प्रस्थान झाले

या दिंडीचा अरणगाव येथे पहिला मुक्काम होणार आहे तेथे कल्याण गोंधळी यांचे किर्तन संध्याकाळी होणार आहे. दुसरा मुक्काम वालवड येथे होणार आहे. येथे काळेश्वरी भैय्या आराधी मंडळ यांचे गाणे होतील. तिसरा मुक्काम श्रीगोंदा येथे होणार आहे खंडु गोंधळी यांचा कार्यक्रम होणार आहे. चौथा मुक्काम पवार वस्ती दौंड येथे होणार आहे तिथे आईसाहेब जागरण गोंधळी यांचा गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे.


पाचवा मुक्काम भागवत काळे यांच्या वस्तीवर माळवाडी येथे होईल यावेळी महेश महाराज देशपांडे यांचे किर्तन होईल.
सहावा मुक्काम मोरगाव येथे गणपती मंदिर ट्रस्टच्या जागेत होईल तेथे पाटस येथील जय तुळजाभवानी गोंधळ पार्टी यांचा गोंधळ कार्यक्रम होईल. सहावा मुक्काम जेजुरी (पायरी) येथे होणार आहे तेथे भाकरे महाराज यांचे किर्तन होणार आहे. दि. आठ रोजी जेजुरीतील खंडोबा मंदिर येथे दर्शन घेऊन महाप्रसाद वाटप करून दिंडीचे विसर्जन होईल असे भक्तगणांनी बोलताना सांगितले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा