सामाजिक कार्यकर्ते कै. विठ्ठल (आण्णा) राऊत यांना जामखेड भूषण तर बबलू टेकाळे व आजीनाथ हजारे यांना जामखेड गौरव पुरस्कार.
जगदंबा प्रतिष्ठान, राजमुद्रा युवा मंच जामखेड तसेच शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी काशिद या गेल्या बारा वर्षापासून सर्व महिलांना घेऊन अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करतात. यात रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच परिसरातील विविध क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, महिलांची भव्य दिव्य मिरवणूक अशा पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. यात परिसरातील सामान्यातून असामान्य कर्तृत्व निर्माण करणाऱ्या मान्यवर यांना जामखेड भूषण व जामखेड गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात असामान्य कर्तृत्व निर्माण करणारे, गोरगरिबांना मदत करणारे, शिक्षण, स्वच्छता, अध्यात्मिक, धार्मिक कार्यात आपल्या कामाचा ठसा उमटविलेले स्वर्गीय विठ्ठल आण्णा राऊत यांना मरणोत्तर जामखेड भूषण पुरस्कार देण्यात आला. तसेच शारिरीक कसरती, मल्लखांब, लाठीकाठी, भालाफेक, तलवार बाजी या शिवकालीन युद्ध कौशल्य शिकविणारे, राष्ट्रीय पातळीवर चमकणारे विद्यार्थी घडविणारे संतोष (बबलू) टेकाळे व शिक्षकी पेक्षा करत बचतगट व पतसंस्था स्थापन करून पाच जिल्ह्यात 52 पतसंस्था व पाच हजार बचतगट निर्माण करणारे ज्योती क्रांती पतसंस्थेचे चेअरमन आजीनाथ हजारे या दोघांना जामखेड गौरव पुरस्काराचे सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बापुसाहेब देशपांडे होते. यावेळी पुरस्कार विजेते आजीनाथ हजारे, बबलू टेकाळे, विठ्ठल आण्णा राऊत यांचा पुरस्कार स्वीकारणारे विनायक राऊत, महेश राऊत, यावेळी
प्रा. मधुकर राळेभात, अनंता खेत्रे, डॉ. प्रताप चौरे, डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. वैभव तांदळे, डॉ. शशांक शिंदे, डॉ. भारत दारकुंडे, निलेश पवार, भीमराव डुचे, मनोज भोरे, भरत जगदाळे, नगरसेवक बिभीषण धनवडे, बाळासाहेब आरेकर, किरण उदारे, अवी बेलेकर, सुरज काळे, अक्षय बारहाते, अजय गौड, कैलास खेत्रे, पप्पू काशिद, प्रताप काशिद, सुनील यादव, संजय बेरड, मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, उमेश राऊत, दिपक सुरसे, भैय्या कात्रजकर, विजय काशिद, अल्ताफ शेख, प्रविण चोरडिया, लहू बोराटे, नामदेव राळेभात, निलेश बोळे, ऋतुराज फुटाणे, हनुमंत वराट,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे लहू बोराटे आदर्श शिक्षक, कृष्णा वराट साहाय्यक विक्रीकर अधिकारी, अविराज वराट महसूल साहाय्यक, गायत्री राळेभात पीएसआय, सुभाष सोनटक्के पीएसआय, भाऊसाहेब गोपाळघरे पीएसआय यांचाही सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील नवे तर राज्यातील हा अनोख्या पद्धतीने महिला आयोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दि. 27 रोजी दिवसभर रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते यात सुमारे 135 रक्तदात्यांनी रक्तदान करत छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.
जाणता राजा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेडमध्ये महिला अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी संजय काशिद यांनी केले होते यावेळी रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य मिरवणूक, शिवजन्मोत्सव सोहळा, पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी रोहिणीताई काशिद, विजयाताई गुगळे, सुरेखा सदाफुले, कांचन दाहितोंडे, मीना बेलेकर, सुनिता बोराटे, ज्योती राऊत, विद्या भोसले, आरती राळेभात, सोनाली पवार, कामिनी राजगुरू, सारिका जमदाडे,
शिवसेनेच्या वतीने हे बारावे वर्ष आहे तर महिला आयोजित शिवजयंतीचे हे तिसरे वर्ष आहे. दि. २७ रोजी दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जामखेड शहरातील लक्ष्मी चौक (संविधान स्तंभ) येथे शिवजन्मोत्सव सोहळा माहिला समिती आयोजित शिवजयंती निमित्त मा.संजय (काका) काशिद मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. २७ मार्च रोजी सायंकाळी ७.०० वा. तालुकास्तरीय सांस्कृतिक नाट्यछटा स्पर्धा पार पडल्या यात सुमारे वीस टीम सहभागी झाल्या होत्या. याचे परिक्षक म्हणून अविनाश बोधले, संतोष सरसमकर, रजनीकांत साखरे, आढाव सर यांनी केले. दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
२८ मार्च २०२४ पालखी सोहळा व भव्य महिला रँली आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बीड रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज पेठ, लक्ष्मीआई चौक (संविधान चौक) सायंकाळी ८.०० शिवरायांची महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रमात विजेत्या तसेच विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा निर्माण करणाऱ्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा सन्मान सोहळा तसेच शिवजन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ति व बुध्दीच्या जोरावर स्वराज्य उभे केले आहे तसेच शक्ति व बुध्दी बरोबरच त्यांच्या मनामध्ये “स्वराज्याची’ आस लागली होती, ज्यावेळेस आस निर्माण होते.
त्यावेळेस तुमच्या हातून भव्य – दिव्य कार्य होते. आपल्याला सर्वांची साथ मिळते.
अशा प्रकारे निस्वार्थ भावनेतून आपण जे काम करत असतो,त्यावेळेस यश नक्की मिळते. याचीच प्रेरणा घेत संजय काशिद हे समाजपयोगी असे रक्तदान शिबीर भरवतात. हे आजच्या काळाची गरज आहे. सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा असून रक्तदान शिबिराच्या माध्यमातुन जनजागृती होत आहे. रक्त मिळाल्या ने एखाद्या चे प्राण वाचू शकतात व प्राण वाचवण्याचे भव्य दिव्य कार्य संजय काशिद हे करत आहेत.