अनाथ निराधार विद्यार्थीनींना शालेय स्वामी विवेकानंद बचतगटा तर्फे साहित्यांचे वाटप.
जामखेड प्रतिनिधी
आजची मुले खुप हुशार आहेत. ती आपल्याला काय बनायचे आहे हे स्वतःच ठरवत आहे. आणि अशी मुले आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपले ध्येय पुर्ण करण्यासाठी झटत असतात. आणि अश्या वेळी त्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक होत असताना त्यांचे पालक उपस्थित असणे गरजेचे आहे. कारण आपली मुले शिकत असलेली शाळा कशी आहे. मुलांना काय शिकवले जाते हे पाहणे मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि अश्या वेळी शाळेने पालकांना बोलावले त्याबद्दल शाळेचे आभार मानले पाहिजेत. तसेच स्वामी विवेकानंद बचत गटानेही या शाळेतील विद्यार्थीनींना केलेले वाटप त्यांचा आयुष्याला चालना देणारे ठरेल जामखेड तालुक्यातील विविध सामाजिक धार्मिक कामात बचत गट तन मन धनाने सहभाग घेत आसतो त्यांचेही मानावे तेवढे आभार कमीच आहेत. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व स्थानिक स्कुल कमीटीचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
जामखेड तालुक्यातील फक्त मुलींसाठी एकमेव असलेल्या
रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात गुणवंत म्हणजेच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या एकुण ३४ मुलीं व त्यांच्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील निराधार व अनाथ परंतु गुणवंत असलेल्या १२० विद्यार्थीनींना जामखेड शहरातील स्वामी विवेकानंद बचत गटाच्या वतीने वह्यांचे १२० संचाचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयात शिक्षिका असलेला अर्चना शिंदे यांनीही आपली सामाजिक जबाबदारी ओळखत एकुण सात विद्यार्थींनी वह्यांचे सात संच वाटप केले. या सर्व शालेय साहित्याचे वितरण उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व स्थानिक स्कुल कमीटीचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते स्थानिक स्कूल कमिटीचे, सदस्य सुरेश भोसले, प्रा. कुंडल राळेभात, स्वामी विवेकानंद बचत गटाचे अध्यक्ष अरूण उगले, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, स्वामी विवेकानंद बचत गटाचे अध्यक्ष अरुण उगले, उद्योजक रवि शेळके,यशाळेच्या मुख्याध्यापिका कुसुम चौधरी, पर्यवेक्षक संजय हजारे, स्वामी विवेकानंद बचत गटाचे पदाधिकारी संतोष सरसमकर, पत्रकार अशोक वीर, किरण सोनवणे, तुषार ढवळे, अशोक शिंदे, बाळासाहेब खैरे, प्रदीप जगदाळे, राजेश भोगील,संजय शिंदे, विकास पवळ, डॉ. दिनेश रसाळ, मनोज बन, भाऊसाहेब कात्रजकर, बाबु पवार, महेश नारके, महेश राळेभात, राजेंद्र डोकडे आदी मान्यवर,विद्यार्थीनी व पालक शिक्षक,शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना जेष्ठ नेते सुरेश भोसले म्हणाले की, कोणताही चांगली गोष्ट सहजच होत नसते. त्यासाठी कोणाची ना कोणाची मेहनत असते. या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका मुख्याध्यापिका व शाळा व्यस्थापनाच्या मेहनतीमुळे आज कन्या विद्यालयाचे नाव विविध उपक्रम व स्पर्धा परिक्षांमध्ये मोठे केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेच्या मुख्याध्यापिका कुसुम चौधरी म्हणाल्या की, कन्या विद्यालय हे गुणवत्तेमध्ये जामखेड तालुक्यात एक नंबरचे विद्यालय आहे. विद्यार्थी
संख्या, शिस्त, टापटीत याबाबत ही विद्यालय उत्तम आहे. म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की, या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ९७.९६ टक्के लागलेला आहे तर ३४ मुली ९०% पेक्षा पुढे गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आहेत. ही सोपी गोष्ट नाही. पण ते कन्या विद्यालयाने करून दाखविले आहे. म्हणूनच कन्या
विद्यालय गुणवत्ते जामखेड तालुक्यात एक नंबरवर आहे. त्याप्रमाणेच एन एम एस स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप तसेच आठवी व पाचवी स्कॉलरशिप अशा स्पर्धा परीक्षांमधेही विद्यालयाचा निकाल नेहमीच सर्वोत्तम लागलेला आहे. आणि हीच ऊर्जा घेऊन आपल्याला याही वर्षी हीच गुणवत्ता टिकवण्यासाठी काम करायचे आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी विद्यार्थीनींचा गौरव केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर तर आभार शंभुदेव बडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय पाटील, सुग्रीव ठाकरे, संतोष सरसमकर, मोहन यादव, बाबासाहेब आंधळे, अशोक घोडके, सचिन डोईफोडे, भूषण गडगुले, मीरा साळुंखे, विशाखा ससाणे, भारती गायकवाड, ज्योती पोकळे, विनिता चेडे, सपना साठे, अर्चना शिंदे ,स्वाती लोंढे, शंभूदेव बडे, विलास पवार, कल्याण महानवर, प्रशांत पोकळे आदींनी परिश्रम घेतले.