जामखेड प्रतिनिधी
डॉ. डि.बी.खैरनार प्रतिष्ठान आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 62 जनांनी रक्तदान केले आहे. सन 2001 सालापासून अविरत पणे खैरनार प्रतिष्ठान हे रक्तदान शिबीर आयोजित करत आहे. डॉ खैरनार दादा यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून 50 वर्ष लोकांची सेवा केली. सर्व सामान्य गोर, गरीब लोकांना अत्यंत कमी पैशात सेवा मिळण्याचे ठिकाण म्हणजे दादांचा दवाखाना आहे. कमी पैसे असोत किंवा पैसे नसोत. रुग्ण हक्काने दवाखान्यात जात असत. त्यांना वैद्यकीय सेवा मिळत असे.
डॉ. खैरनार दादाचे निधन सन 2015 साली झाले. दादा असतानाच डॉ. डि.बी खैरनार प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. सन 2001 पासून अविरत पणे खैरनार प्रतिष्ठान रक्त दान शिबीर आयोजित करत आहे. हे रक्तदान शिबीर दादांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात येत आहे. गेल्या 24 वर्षापासून हे रक्त दान शिबीर आयोजित केले जात आहे.
यावर्षी 62 जनांनी रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबीरात. जन कल्याण रक्त केंद्र, नगर. यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. कै. दादा खैरनार यांनी जो जन सेवेचा वसा घेतला होता. तो वसा दादांचे दोन्ही सुपुत्र पुढे चालवत आहेत. डॉ प्रकाश खैरनार उधोजक प्रदीप खैरनार हे बंधु दादांनी घालून दिलेला जन सेवेचा वसा यथार्थ पणे पुढे चालवत आहेत. शिबीर यशस्वी करण्यासाठी नागेश पाटील, प्रमोद दाणी, दादा अंदुरे सह आदींनी परिश्रम घेतले. या शिबिरात जामखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय राऊत यांनी रक्त दान केले. गेली विस वर्षे झाली दत्तात्रय राऊत हे सातत्याने दरवर्षी रक्त दान करत आहेत.