लंकेची हवा फक्त सोशल मीडियावरच – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

- Advertisement -spot_img

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे जामखेडमध्ये उद्घाटन

प्रचार कार्यालयामुळे निवडणूक प्रचार कामाला वेग येणार आहे. मोदी सरकारची विकास कामे, लाभार्थी, पक्षाची भूमिका, योजना जनतेपर्यंत पोहोच करा समोरच्या उमेदवाराकडे दाखवण्यासारखे कसलेही काम नाही. त्यांची हवा फक्त सोशल मीडियावर आहे. सामान्य माणसाच्या मनात मोदी यांच्या वर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांने आपापले गाव सांभाळा आपले मत मोदींना आहे. स्वतः ला झोकून देऊन काम करा,आपापल्या गावात मताधिक्य द्या
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपला सिंहाचा वाटा असावा असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले

अहिल्यानगरचे महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जामखेडमध्ये झाले यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, विनायक देशमुख, रवी सुरवसे, युवा मोर्चा तालकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, खर्ड्याचे सरपंच संजिवनी पाटील, पवन राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाउपाध्यक्ष बापुसाहेब शिंदे, संध्या सोनवणे, दिपाली गर्जे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, तुषार पवार, अँड बंकट बारवकर, सोमनाथ पाचारणे, मनोज कुलकर्णी, वैजनाथ पाटील, प्रविण चोरडिया, पांडुरंग उबाळे, मकरंद काशिद, तुषार बोथरा, महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की,
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. संपूर्ण तालुक्यात एकाच वेळी प्रचार सुरू आहे. गावोगावी घराघरात आपला प्रचार पोहोचला आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोदी सरकारच्या योजना घराघरात आलेल्या आहेत, जनता समाधानी आहे. मतदान वाढवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, मोदी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोच करा सर्वाधिक मताधिक्याने आपला उमेदवार निवडून आला पाहिजे,
पारनेर विधानसभा मतदारसंघात विखे पाटील यांना
पन्नास हजार मताधिक्य मिळणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा शहराध्यक्ष पवनराजे राळेभात यांनी तर आभार युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी मानले.

 

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा