भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमीत्त डॉ सागर शिंदे यांनी १३ अनाथ विद्यार्थ्यांचे घेतले शैक्षणिक पालकत्व.

- Advertisement -spot_img

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन डॉक्टर सागर शिंदे यांनी १३ अनाथ  विद्यार्थ्यांचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

जामखेड प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश व कन्या विद्यालय मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना देऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


  यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्रिशरण पंतशीर घेऊन वंदन करण्यात आले .
      डॉक्टर सागर शिंदे यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल्या १३ गरीब अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ,ड्रेस, दप्तर  वितरित करण्यात आले.
   तसेच त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वार्षिक सर्व फी  १२०००रु चा चेक डॉ शिंदे यांनी विद्यालयाकडे सुपूर्त केला .
      डॉक्टर सागर शिंदे हे नेहमीच गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना मदत करत आहेत आत्तापर्यंत त्यांनी शंभर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.
       या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद होते प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध डेंटल डॉ सागर शिंदे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले,प्राचार्य मडके बी के ,  मुख्याध्यापक संजय हजारे,  पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, कुंडल राळेभात, दीपक सांगळे ,गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, रघुनाथ मोहळकर , साळुंके बी एस, एनसीसी ऑफिसर मयुर भोसले,संतोष पवार, गाडे पी एस, प्रा विनोद सासवडकर, प्रा कैलास वायकर, तेजपाल सिंह,संभाजी इंगळे,ज्ञानेश्वर लटपटे,ज्योती पालकर,शिंदे बी एस, सर्व शिक्षक ,नागेश कन्या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विनोद सासवडकर,संतोष ससाने  यांनी मनोगत व अभंग मॅडम, अशोक आव्हाड यांनी गीत गायन केले .
    डॉक्टर सागर शिंदे यांनी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी दररोज अभ्यास करावा डॉ आंबेडकरांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवावा. महापुरुषांच्या प्रेरणेने गरीब अनाथ विद्यार्थ्यांना मदत करण्याचे कार्य करत आहे असे मनोगत व्यक्त केले
     स्कूल कमिटी सदस्य  सुरेश भोसले यांनी डॉ आंबेडकरांचे विविध पैलूंचे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष बबन काशीद यांनी  विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा जीवन चरित्राचा अभ्यास करावा व अभ्यासात सातत्य ठेवून व व्यायामाची आवड निर्माण करावी.
असे मनोगत व्यक्त केले.
     अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल डॉक्टर सागर शिंदे यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन गुरुकुल आठवी ‘अ’चे वर्गशिक्षक संतोष पवार व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.
       सूत्रसंचालन  ऋषभ सपकाळ व अमित गायकवाड व आभार प्रदर्शन शुभम सोनवणे या विद्यार्थ्यांनी केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा