आता नाक कान घसा या रुग्णांनासाठी पन्हाळकर हाॅस्पीटल येथे तज्ञ डॉ शिवानी पन्हाळकर उपलब्ध
जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहर हे हॉस्पिटलच्या बाबतीत मेडिकल हब झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांसाठी अल्पदरात सेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे. पन्हाळाकर हॉस्पिटल हे चांगल्या प्रकारे जामखेड शहरात नावजलेले आहे. कारण पन्हाळाकर हॉस्पिटल हे प्रत्येक रुग्णांची आपल्या कुटुंबातील माणसा प्रमाणे सेवा करते असे मत भाजपचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.

आधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आरोग्य क्षेत्रात विश्वास संपादन केलेल्या जामखेड शहरातील पन्हाळकर हाॅस्पीटलमध्ये आज रविवार दि 30 मार्च रोजी सकाळी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर डॉ. शिवानी विष्णुपंत पन्हाळकर एम.बी. बी.एस, एम. एस, इएनटी (कान नाक घसा तज्ञ) यांच्या नवीन ओपीडीचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामुळे आता नाक कान घसा या रुग्णांना नगरला जाण्याची आवश्यकता पडणार नाही

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप चे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, प्रमुख पाहुणे म्हणून बबन (काका) काशिद, भाजपा तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद, प्रा. लक्ष्मण ढेपे सर, संजय (काका) काशिद, अमित जाधव, डॉ प्रताप चौरे, डॉ. सुशील पन्हाळाकर डॉ. शिवानी पन्हाळाकर, डॉ. विक्रांत केकान, डॉ प्रशांत गायकवाड, डॉ फारुख शेख, विकीभाऊ सदाफुले, डॉ. विकी दळवी, डॉ. मेघराज चकोर डॉ सादेख पठाण डॉ. भरत देवकर भाईजान शेख, विष्णुपंत पन्हाळाकर ऋषिकेश मोरे, अजय कोल्हे, आशिष कदम डॉ अबेद जमादार डॉ मालोजी लांडगे डॉ. प्रतिक्षा नवले शहाजी तादगे गणेश गवसने सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यानंतर बबन काका काशिद यांनी सांगितले की जामखेडच्या प्रगतीला तालुक्यातील डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. बीड रोड पासुन डॉक्टर पन्हाळाकर हॉस्पिटल ची सुरवात झाली व प्रगती देखील झाली. पन्हाळाकर हॉस्पिटल मध्ये आता सर्व सेवा एकाच छताखाली आल्याने रुग्णांना बाहेरगावी जाण्याची गरज नाही.
अजय (दादा) काशिद यांनी बोलताना सांगितले की डॉ. सुशील पन्हाळाकर हॉस्पिटल मध्ये प्रथमच नाक कान घसा सेवा जामखेड शहरात सुरू झाली आहे. परीस्थितीला व रुग्णांना समजुन घेण्याचे काम डॉ सुशील पन्हाळाकर हे करत असतात. प्रा. लक्ष्मण ढेपे बोलताना म्हणाले की पन्हाळाकर हॉस्पिटल हे हॉस्पिटल चालवत नाहीत तर हॉस्पिटलच्या माध्यमातून कुटुंब चालवतात त्यामुळेच हॉस्पिटल ची प्रगती झाली आहे. सय्यमी कुटुंब प्रगतीच्या दिशेने जात असते असेच पन्हाळाकर कुटुंब देखील प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.