तुकाराम महाराजांच्या साधनेमुळे त्यांना दिव्य शरिर प्राप्त झाले –  रोहिदास महाराज गर्जे शास्त्री

- Advertisement -spot_img

जामखेड शहरात तुकाराम बीजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

जामखेड प्रतिनिधी

“जगद्गुरु तुकोबाराय यांनी आपल्या जीवनात अशी साधना केली की त्यांचे शरीर दिव्यत्वाला प्राप्त झाले होते. वैकुंठाला जाण्यापूर्वी त्यांचे जे शरीर बनले होते ते दिव्य होते. असे मत भागवताचार्य ह. भ. प. रोहिदास महाराज गर्जे शास्त्री  यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले.

जगद्गुरु तुकोबाराय यांच्या त्रिशतकोत्तर ‘अमृत’ महोत्सवी अर्थात ३७५ वा बीजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त जामखेड येथील श्रीविठ्ठल मंदिरात ३८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी ह. भ. प. रोहिदास महाराज गर्जे शास्त्री हातोला ता. आष्टी यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. यावेळी दिलीप बाफना, महादेव महाराज रासकर तसेच तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

गर्जे शास्त्री यांनी यावेळी तुकाराम महाराज यांचे चरित्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र व त्यानंतर काल्याचा प्रसंग सांगत असताना भगवान श्रीकृष्ण यांच्या गोकुळातील लीला यांचे सुंदर वर्णन करत त्यांच्या सुरेल आवाजात त्यांनी अनेक गवळणी अभंग गायले यावेळी सर्वच स्रोते अतिशय मंत्रमुग्ध होऊन गेले. यावेळी पंढरीनाथ महाराज राजगुरू मृदंगाचार्य प्रमोद महाराज पदमुले, गायक  विष्णु महाराज शेंडगे व उत्तरेश्वर पुर्भे, संवादिनी जगन्नाथ धर्माधिकारी, शंकर माळी, दत्ता म्हेत्रे, रावसाहेब कोल्हे, अश्रू कोल्हे अशोक राळेभात संतोष राळेभात पाटील यांची साथसंगत लाभली.

दहीहंडीचा अभंग घेऊन गर्जे शास्त्री यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली व आरती करून महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

या सप्ताहात ज्ञानेश्वर महाराज पवने जामखेड, राम महाराज डोंगर जाटनांदूर, चेतन महाराज बोरसे मालेगावकर, ज्ञानेश्वर महाराज नगरे सिताराम गड, खर्डा, मनोहर महाराज इनामदार जामखेड,  दत्ता महाराज हुके परांडा, गोविंद महाराज जाटदेवळेकर नामदेव महाराज विधाते यांची कीर्तने झाली. तर भागवताचार्य रोहिदास महाराज गर्जे शास्त्री यांचे काल्याचे किर्तन झाले.

या निमित्ताने जगद्गुरु तुकोबाराय व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची शहरातून टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

तसेच  सकल संतांच्या चरित्र कथेची एक संगीतमय कलाकृती असलेल्या ‘ज्ञानदेवे रचिला पाया! तुका झालासे कळस!!’ हा पाच दिवसीय सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

        या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन गुलाब जांभळे यांचे होते लेखन व निवेदन प्रा.श्रीकांत होशिंग व आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांचे तर अहिल्यानगर येथील प्रसिद्ध गायक आदेश चव्हाण व ऋतुजा पाठक यांचे गायन, प्रणव देशपांडे (हार्मोनियम),सूरज शिंदे (तबला) यांची साथसंगत लाभली.

या उत्सवासाठी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, गुलाब जांभळे, कॅप्टन लक्ष्मण भोरे,  अंकुश उगले,
आबासाहेब वीर, अशोकराव मुळे राजेभाऊ म्हेत्रे महाराज दिनकर जाधव डिगांबर चव्हाण यांनी परिश्रम घेतले. गेले आठ दिवस येथे मोठे अन्नदान करण्यात आले. यावेळी पंगतीत वाढण्यासाठी महिलांनी विशेष  परिश्रम घेतले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा