जामखेड प्रतिनिधी
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण केल्यानंतर जामखेड तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाला समर्थन दिले आहे. याच अनुषंगाने पिंपरखेड येथील अभ्यासु, प्रशासनाशी जवळीक आसलेले, आक्रमक नेते बापूसाहेब शिंदे यांची जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण केल्याने तालुक्यातील राजकारण पुर्णत: बदलून गेले आहे. जामखेड तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाला पसंती दिली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व प्रशासनावर चांगली पकड असणारे आक्रमक नेते बापूसाहेब शिंदे तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रविण कुमार उर्फ बाळासाहेब नाहटा यांनी उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र दिले आहे.
निवडी नंतर बापुसाहेब शिंदे म्हणाले की मी मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पदावर काम करत आसताना सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. नियुक्ती पत्र देता वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब नहाटा, दत्तात्रय पानसरे, जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, रमेश तुपेरे, माजी सरपंच सुरज रसाळ, राजेंद्र नन्नवरे, तसेच पिंपरखेड, धानोरा व कवडगाव येथील कार्यकर्ते उपस्थित होते. बापुसाहेब शिंदे यांच्या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते सचिन (सर) गायवळ, निलेशभाऊ गायवळ, माजी सरपंच सखाराम भोरे सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.