ह. भ. प. दत्तात्रय महाराज हुके यांच्या काल्याच्या कीर्तनाने जमादारवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

- Advertisement -spot_img

भगवान श्रीकृष्णाचे चरित्र हा चमत्कार आहे :दत्तात्रय महाराज हुके

जामखेड प्रतिनिधी
संत वामनभाऊ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत व रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांच्या आशिर्वादाने गेल्या सात सुरू आसलेल्या नामसप्ताहाची आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी सांगता झाली गेली तीस वर्षे वैराग्य ज्ञानशिरोमनी रघुनाथ महाराज चौधरी यांचे काल्याचे किर्तन होत असे परंतु प्रकृतीच्या कारणामुळे ते किर्तन सेवा करू शकले नाहीत त्यांच्या अनुपस्थितीत पंढरपूर श्रेत्रात वारकरी संप्रदायचे कार्य मोठ्या निष्ठेने करत असलेले दत्तात्रय महाराज हुके यांनी सेवा केली.


    वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाचा दंडक आसा आहे की
“चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी”
या प्रमाणे काला प्रकरणातील जगद्गुरू तुकोबाराय यांच्या गौळणीवर चिंतण मांडले
या नामसप्ताहातासाठी काल्याच्या कीर्तनासाठी आ. राम शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे प्रा. मधुकर (आबा) राळेभात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले,नगरसेवक अमित चिंतामणी भाजपाचे प्रविण सानप यांची उपस्थिती होती
     गेली सात दिवस पंढरीनाथ महाराज राजगुरू,दादा महाराज सातपुते,दिपक महाराज गायकवाड,विजय महाराज बागडे, विष्णु महाराज म्हेत्रे,रामदास महाराज आजबे
श्रीराम महाराज नेटके भाऊसाहेब आजबे बाळासाहेब (मुंडा) आजबे योगेश आजबे परमेश्वर आजबे बाळु आजबे  पांडुरंग आजबे गौतम आजबे बलभीम आजबे बाल टाळकरी चैतन्य आजबे समर्थ आजबे संग्राम वीर श्रीराम वीर तसेच विनेकरी हिरालाल नेटके यांनी सेवा दिली उपस्थित मान्यवरांचा सन्मान नगरसेवक गणेश आजबे हरिभाऊ आजबे कैलास नेटके बाळासाहेब आजबे आनिल नेटके यांनी केला.
तसेच रघुनाथ महाराज चौधरी हे किर्तनसेवेसाठी येऊ न शकल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी जमादारवाडी सप्ताह कमिटीचे पदाधिकारी यांनी जाऊन भेट घेतली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा