
जीवनदीप वेलनेस सेंटर मधून व्यायामाबरोबरच आहाराचे मार्गदर्शन मिळणार- प्रा. मधुकर आबा राळेभात
सर्वांनी 24 तासातील एक तास स्वतःच्या आरोग्यासाठी द्यावा – सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ

वजन कमी करण्याची 100 टक्के हमी.-वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार शिवाजी गोपाळघरे सर

जामखेड प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड जामखेड मध्ये किशोर गायवळ व सौ सोनाली गायवळ या जोडीने निरोगी जीवनासाठी जामखेडकरांच्या सेवेसाठी जीवनदीप वेलनेस सेंटर सुरू केले आहे. या वेलनेस सेंटरचे उद्घाटन वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार शिवाजी गोपाळघरे सर ,ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात , सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ, यांच्या शुभहस्ते झाले तर प्रमुख उपस्थिती मार्केटचे सभापती शरद कार्ले, शिवनेरीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, शिवप्रतिष्ठान तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले,नगरसेवक मोहन पवार , जागतिक आरोग्य सल्लागार दत्तात्रय गोपाळघरे, गोकुळ जायभाय सर, अरुण बोलभट, चंद्रकांत ढवळे, सौ उज्वला ताई ढवळे, अतुल वारे सौ ज्योती वारे, मच्छिंद्र जगदाळे, सुभेदार गोविंद बनकर ,सौ उज्वला बनकर, राहुल बेदमुथ, अशोकशेट डोंगरे, तात्याराम फुले सर, निलेश भोसले ,विकास जाधव, नवनाथ दाभाडे सर प्रा रमेश बोलभट ,सुनील जगताप, जयहरी शिंदे,मयुर भोसले आदि उपस्थित होते मान्यवर.

वेलनेस सेंटर चे संचालक किशोर गायवळ व सौ सोनाली गायवाळ यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
जीवनदीप वेलनेस सेंटरचे संचालक किशोर गायवळ यांनी प्रास्ताविकामध्ये
वेलनेस सेंटर ची माहिती देताना आहाराकडून आरोग्याकडे आम्ही मार्गदर्शन करणार आहोत तसेच यामध्ये योग्य व्यायाम संतुलित आहार, चांगली जीवनशैली, फिटनेस वाढवणे, सकारात्मक विचार करणे व वजन कमी करणे तसेच वजन वाढवणे याविषयी यावेळी सेंटरमधून प्रॅक्टिकल व मार्गदर्शन मिळेल, सकस संतुलित आहार याविषयी मार्गदर्शन केले जाईल व शंभर टक्के वजन कमी करण्याचे हमी दिली असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जागतिक आरोग्य सल्लागार शिवाजी गोपाळघरे सर यांनी मनोगत मध्ये देशाचे पंतप्रधान सुद्धा एक तास व्यायामासाठी काढतात तर आपण का काढू नये. जास्त वजनामुळे रक्तदाब वाढतो अटॅक येण्याची शक्यता असते. वेळीच सर्वांनी जागृत होऊन व्यायामाची सवय लावावी व संतुलित आहार ग्रहण करावा.जामखेड मध्ये जीवनदीप वेलनेस सेंटर सुरू होत आहे तरी जामखेडकरांनी याचा लाभ घ्यावा असे मनोगत व्यक्त केले.
जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांनी जुन्या पिढीतील लोक सकस आहार खात होते.सतत काम करत असल्यामुळे तब्येती चांगल्या होत्या. परंतु आता फास्ट फूड मुळे व धावत्या जगात सर्वांच्या शरीर रचना बिघडत चालली आहे. पैसा तर सर्वच कमावणार आहेत परंतु शरीर संपत्ती महत्त्वाची आहे त्यामुळे सर्वांनी व्यायाम करावा व या व्यायामाबरोबरच आहाराचे नियोजन सर्वांनी करावे. यावेळी सेंटरचा सर्वांनी फायदा घ्यावा.
सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवाळ
यांनी जामखेड मध्ये जीवनदीप वेलनेस सेंटर सुरू झाले आहे ही आनंदाची बाब आहे व सर्वांनी व्यायाम करावे 24 तासातला एक तास आपल्या शरीरासाठी सर्वांनी अवश्य द्यावा असे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कॅप्टन लक्ष्मण भोरे तसेच सभापती शरद कार्ले उपाध्यक्ष यसिंग उगले यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ जायभाय
आभार प्रदर्शन किशोर गायवळ व सौ सोनाली गायवळ .
जीवनदीप वेलनेस सेंटरची वैशिष्ट्ये
FREE BODY ANALYSIS चेक अप
स्वतःच्या घरातूनच ऑनलाईन व्यायाम किंवा जीवनदीप वेलनेस सेंटर ऑफलाईन व्यायाम करू शकता
निरोगी जीवनाचा सल्ला व मार्गदर्शन.
वाढलेल्या वजनामुळे किंवा वजन कमी असल्यामुळे खालील त्रास होऊ शकतात
सतत थकवा येणे,सांधे हाडे दुखणे, गॅस, पचन ,पित्त’ पिंपल्स येणे, चेहऱ्यावर वांग येणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे, केस गळणे, कोंडा होणे सोरायसिस एक्झिमा मुलांची वाढ व विकास हृदयाचे स्वास्थ ,डायबेटीस हाय कोलेस्ट्रॉल, हाय बीपी, हायपर थायरॉईड, पी.सी.ओ.डी यासाठी खास सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे.
पत्ता:- छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड गाळा नंबर ८०-८१ बीड रोड जामखेड
वेळ पहाटे :-पाच वाजल्यापासून सुरू
मो न – 95793 67696