जामखेड प्रतिनिधी
सुनील कासार उर्फ दादा कलासागर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जामखेड शहरातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार सुनील उर्फ दादा कलासागर यांचे काल रात्री ११=०० वाजता समर्थ हॉस्पिटल,बीड रोड,जामखेड येथे २७/४/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
लोकसभा निवडणूक छायाचित्रणासाठी गेले असता त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने उपचारा करता रुग्णालयात दाखल केले परंतु दोनच दिवसात त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात वडील राजेंद्र कासार, पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
आज रविवार दिनांक २८/४/२०२४ रोजी दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात जामखेड येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले ,
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राजेंद्र कोठारी,उद्योजक संजय नहार, कांतीलाल कोठारी ,अजय कोठारी, अशोक चोरडिया, हिम्मत गांधी,मा. नगरसेवक पवनराजे राळेभात, अमित चोरडिया,सागर अष्टेकर ,विजय अष्टेकर, बलराम आहूजा, अशोक वीर, प्रीतम काथवटे ,नितीन तवटे ,शशिकांत अंदुरे, ज्ञानेश्वर अंदुरे, किशोर अंदुरे ,सागर अंदुरे, स्वप्निल बरबडे, निरंजन डोंगरे ,निलेश भंडारी, गिरीश काथवटे ,अनिल लोहकरे ,विजय कल्याणकर, संजय फुटाणे , अभिजीत लोहकरें,संजय शिंगवी, भैय्या डोंगरे ,शहाजी तंटक ,ओंकार तंटक, प्रशांत शेठ कानडे,अमित भंडारी, दीपक ढोले, दत्ता चव्हाण, प्रशांत पवार ,आदेश निमोणकर , कैलास शर्मा, राजेंद्र भोगील, नवनाथ कानडे, मनोज बन, पियुष पडियार ,सर्व व्यापारी वर्ग ,फोटोग्राफर उपस्थित होते. त्यांच्या निधनाने जामखेड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे,अनेकांनी येऊन भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.