जामखेड प्रतिनिधी
जामखेड खर्डा रस्त्यावर बटेवाडी शिवारात एसटी बस व चारचाकी वाहनाचा समोरासमोर रात्री साडेबाराच्या सुमारास भिषण अपघात झाला यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले त्यांना जामखेड येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पोलिसांनी अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले होते उपचार घेत असताना त्यातील दोन जण मृत्यु पावल्याचे जाहीर केले असून तीन जणांवर उपचार चालू आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड खर्डा रस्त्यावर बटेवाडी शिवारात कोपरगाव आगाराची शिर्डी हैदराबाद बस शिर्डी येथे जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास एस.टी. क्रमांक M H ०९ FL १०२७ व वडगाव गुप्ता अहमदनगर येथील चारचाकी वाहन क्रमांक (एम एच १६ ए टि ६४९२) या दोन वाहनाची समोरासमोर धडकून भिषण अपघात झाला. याबाबत ११२ क्रमांकावरून जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना फोन झाला असता त्यांनी तातडीने पेट्रोलिंग वाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे, पोलीस कॉन्स्टेबल देवीदास पळसे,पोलीस कॉन्स्टेबल संतोष भोरे वाहनचालक अडसुळ व १०८ क्रमांक व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपले अँम्ब्यलन्स घेऊन पाठवले व पाच जखमी
मयत विजय गंगाधर गव्हाणे २४, पंकज सुरेश तांबे २४मयुर संतोष कोळी वय १८ सचिन गिते वय २८ अमोल डोंगरे वय ३० सर्वजण वडगाव गुप्ता रा. अहमदनगर येथील असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार जामखेड येथील खाजगी रुग्णालयात करून अहमदनगर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले उपचार सुरू असताना त्यातील विजय गंगाधर गव्हाणे २४, पंकज सुरेश तांबे रा.
वडगाव गुप्ता अहमदनगर हे मयत झाले आहे.