नगर सोलापूर महामार्गावरील मिरजगाव जवळ झाला आपघात
जामखेड प्रतिनिधी
नगर सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील मिरजगाव जवळील कोकणगाव बायपास जवळ पिकअप गाडी व आयशर टेम्पोचा भीषण अपघात होऊन यामध्ये जामखेड येथील तरुण पिकअप चालकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील कोकणगाव जवळील बायपास नजीक आज दि 27 जुलै रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास महेश उर्फ (मयुर) भगवान मोरे, रा मोरे वस्ती, जामखेड, हा चालक पिकअप क्रमांक एम एच १६ सी डी ५४३१ हा नगरकडून मिरजगावच्या दिशेने जामखेडकडे येत होता. मात्र बायपास जवळ टायर पंचर झाल्याने महामार्गाच्या बाजूला मालवाहतूक पिकप थांबला असता व पंचर झालेला टायर खोलण्यासाठी पिकअप चालक महेश उर्फ (मयूर) भगवान मोरे रा. मोरे वस्ती, जामखेड जिल्हा अहमदनगर ( वय अंदाजे 22 वर्षे ) हा पिकपच्या बाजूला आला असता नगर कडूनच मिरजगावच्या दिशेने येणारा आयशर टेम्पो क्रमांक एम एच १८बी जी १३८० गाडीने उभ्या असणाऱ्या पिकपला जोरदार धडक दिली.
यामध्ये पीक अपने जाग्यावर पलट्या मारल्या व या भिषण अपघातात पिकप ड्रायव्हर मयूर मोरे हा गाडीखाली सापडला त्यातच त्याची प्राणज्योत मालवली व या धडकेत आयशर टेम्पो देखील पलटी झाला आहे. घटनेची माहिती समजताच मिरजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू बागवान तसेच जीवन ज्योती रुग्णवाहिकेचे लहू बावडकर हे तातडीने घटनास्थळी पोहोचवून चालक महेश मोरे यास मिरजगाव येथे उपचारासाठी घेऊन आले परंतु पिकअप चालक मयूर मोरे हा वाचू शकला नाही.
यानंतर त्यांनीच मिरजगाव पोलीस स्टेशनची संपर्क साधून घटनेची माहिती दिली आसता मिरजगाव पोलीस स्टेशनचे पो. कॉ. रोकडे, पो. कॉ. पळशी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला. व अपघाती रुग्णास शवछेदनासाठी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. महेश याचे शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात घेण्यात आला. रात्री आठ वाजता त्यांच्यावर जामखेड येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले महामार्ग झाला वाहतुकीची सुविधा झाली परंतु हा पूर्णपणे मृत्यूचा सापळा बनला असून यासाठी महामार्गाकडून काही उपाययोजना राबवण्यात आल्या नाहीत, याची खंत वाटत आहे बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक फलक लावले नसल्याने गावे देखील समजत नाहीत त्यामुळे काही गाड्यांना जायचे असते एका ठिकाणी परंतु ती वाहने जातात दुसऱ्याच ठिकाणी याची देखील शासनाने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.