अनुश्री प्रशांत होळकर हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त साकेश्वर गोशाळेत चारा वाटप
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात सद्यस्थितीत दुष्काळसदृश परिस्थिती आसुन पाणी टंचाई व चारा टंचाईची समस्या भेडसावत आसताना दिसत आहे त्यात हिरवाचारा तर दुर्मिळच झाला आहे त्यात गोशाळेतील जनावरांसाठी तर तुरळकच उपलब्ध होत आहे हीच गरज ओळखून
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री प्रशांत राजेंद्र होळकर सर यांनी त्यांची लाडकी कन्या कुमारी अनुश्री प्रशांत होळकर हिचा पहिला वाढदिवस गो शाळेतील गाईना हिरवा चारा वाटप करून साजरा केला.शिवप्रतिष्ठान संचालित जामखेड तालुक्यातील साकत येथील साकेश्वर गोशाळेमध्ये ८४ गाईंना पुरेल इतका हिरवा चारा वाटप करण्यात आला.
हिंदू धर्मात गाय हे पावित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतिक मानले जाते.वाढदिवसाचा अनावश्यक, वायफट खर्च टाळत सामाजिक बांधिलकी व उत्तरदायित्वच्या भूमिकेतून,माणुसकीचे नाते जोपासत जो स्तुत्य उपक्रम राबविला,त्याबद्दल समस्त होळकर परिवाराचे आभार शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडूराजे भोसले यांनी मानत, कु.अनुश्रीला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
याप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडूराजे भोसले, धारकरी सचिन देशमुख,अक्षय शेळके,प्राथमिक शिक्षक प्रशांत होळकर सर,स्वराज बॅग प्रिंटींगचे सर्वेसर्वा प्रविण होळकर,जामखेड एमएसईबी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) संतोष होळकर, आशा होळकर,भाग्यश्री होळकर,निकिता होळकर,प्रणव होळकर,अर्पिता होळकर उपस्थित होते.