ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनच्या वतीने हॉटेल सोरीना, पुणे येथे दिनांक 30 मे ते 3 जून पर्यंत राज्यस्तरीय वुशु पंच परीक्षा व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या राज्य वुशु पंच परीक्षा व प्रशिक्षक शिबिरासाठी अहमदनगर जिल्हा वुशु संघटनेच्या वतीने आयडियल स्पोर्ट अकॅडमी जामखेडचे खेळाडू रोहित थोरात, विशाल धोत्रे, श्रेयस वराट व विशाल वाघमोडे हे खेळाडू सहभागी झाले होते. हे सर्व खेळाडू शालेय राज्य वुशु स्पर्धेमधील पदक विजेते आहेत.
हे सर्व खेळाडू पंच परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत. या खेळाडूंना अहमदनगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव, आंतरराष्ट्रीय रौप्य पदक विजेते व राष्ट्रीय पंच लक्ष्मण उदमले व उपाध्यक्ष व प्रशिक्षक शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व खेळाडूंचे अहमदनगर जिल्ह्यामधून कौतुक होत आहे.
या सर्व खेळाडूंचे अहमदनगर जिल्ह्यामधून कौतुक होत आहे.
सहा महिन्यांपुर्वी या खेळाडूंनी पुणे विभागीय शालेय वुशु स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.
अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेसाठी हे खेळाडू खेळले होते.