ह. भ. प.श्री.भाऊसाहेब माणिकराव कोल्हे यांचे दुःखद निधन       जामखेड मधील कोल्हे वस्ती येथील प्रगतशील शेतकरी तथा विठ्ठल भजनी मंडळ जामखेडचे सदस्य वारकरी श्री भाऊसाहेब माणिकराव कोल्हे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.    ते आषाढी व कार्तिकी दिंडी सोहळ्यामध्ये दरवर्षी सहभागी व्हायचे. मोठ्या निष्ठेने व भक्तीभावाने विठ्ठलाची सेवा ते करायचे. रोजचा दिनक्रम काकडा भजन पासून सुरु व्हायचा. नित्यनियमाने देवपूजा हरिपाठ घेतला जायचा. जामखेड मधील विठ्ठल मंदिरातील कीर्तन भजन सारख्या कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात कित्येक दशकापासून ते सेवा करायचे.    त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदाय, भजनी मंडळ व जामखेड शहरावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे.       त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे.

- Advertisement -spot_img

या वेळी श्रध्दांजलीपर भाषणात प्रा. मधुकर आबा राळेभात बोलताना म्हणाले की निष्ठावंत वारकरी व किर्तनाला हजारो प्रमाण देणारा एक उत्कृष्ट भजनी यांची ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी भागवत यासह सर्व संतांचे आभंग मुखवतगत आसणारा विठ्ठलाचा पाईक निघुन गेल्याने आध्यात्मिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
  या दुखःद प्रसंगी ह. भ. प. दिपक महाराज गायकवाड, ह. भ. प. पाठक महाराज,केशवराव कोल्हे, यांच्यासह विविध मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा