सामाजिक जनजागृती फलकांसह,विद्यार्थी शिक्षकांचे ढोलताशापथक मिरवणूकीचे आकर्षण.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील लोकमान्य क्रिडा व सांस्कृतिक मंडळ संचलित नवीन मराठी प्राथमिक शाळेची गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणूकीस शाळेच्या प्रांगणातुन सुरूवात झाली तहसील कार्यालयासमोरून बीड रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पेठेतुन पुढे विसर्जन मार्ग रवाना झाली या मिरवणुकीत भगवे फेटे परिधान केलेले ढोल ताशा पथकाने जामखेडकरांचे लक्ष्य वेधून घेतले होते शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष संचालक या मिरवणूकीत सहभागी झाले होते विद्यार्थींच्या हातामध्ये सामाजिक संदेश देणारे फलक होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी आपली मराठमोळी संस्कृती जप्त ढोल ताशांच्या वाद्यांच्या गजरात ही विसर्जन मिरवणूक काढली आज समाजात डि. जे. सारख्या कर्णकर्कश वाद्यांचा वापर मिरवणुकांमध्ये वाढला आहे त्यामुळे त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहेत आसे सांगितले
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मिना राळेभात बोलताना म्हणल्या की १९९० साली गणेश मंडळाच्या वतीने या शाळेचे रोपटे लावण्यात आले होते त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे १९९१ पासून या शाळेचा गणेश उत्सव वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो डि. जे. संस्कृतीला फाटा देत पारंपरिक आसलेले ढोल ताशा पथक अशी वाद्य मिरवणूकीत वाजवली जावीत हाच संदेश या मिरवणूकीच्या माध्यमातून युवा पिढीने घ्यावा आसे सांगितले